आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्लॅट युजीची काऊंसलिंग सुरू आहे. क्लॅट २०२४ ( शक्यतो १७ डिसेंबर २०२३ ला होईल) साठी आतापासून पुरेसा वेळ आहे. तुम्ही याेग्य नियोजन करून तयारी करू शकता. मात्र, या परीक्षेची तयारी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. देशातील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी क्लॅट आयोजित केले जाते. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू १९८८ मध्ये पाच वर्षांचा एकात्मिक कायदा अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले विद्यापीठ होते. आता देशात एकूण २४ एनएलयु आहेत. यात प्रवेशासाठी क्लॅट परीक्षेसाठी मोठी स्पर्धा असते. त्यामुळे तयारी महत्त्वाची असते. या क्लॅट युजीमध्ये प्रश्न अशा प्रकारे असतात. इंग्रजी भाषा (३०), जनरल नॉलेज (३५), लीगल रीजनिंग (४०), लॉजिकल रीजनिंग (३०) आणि क्वांटिटेटिव्ह टेक्नीक (१५).परीक्षेचे ५ सेक्शन आहेत. मात्र उत्तमप्रकारे जाणून घेण्यासाठी ते तीन भागात वाटतात. इंग्रजी भाषा, लीगल रीजनिंग आणि लॉजिकल रीजनिंग. इतर दोन सेक्शन जनरल नॉलेज आणि क्वांटिटेटिव्ह टेक्नीकला वेगळे समजून घ्यावे लागेल. ३००-४०० शब्दांच्या वाचन आकलनासह पहिल्या तीन विभागांमध्ये नमुना समान आहे. आकलनानुसार प्रश्न विचारले जातात. इंग्रजी आणि लॉजिकल रीझनिंगवरील प्रश्न उमेदवाराच्या उताऱ्याचे आकलन करण्याच्या क्षमतेची चाचणी घेतात आणि त्याच आधारावर प्रश्न विचारले जातात.
तीन विभागांमधून २० उतारे, प्रत्येकातून ५ प्रश्न विचारले जातील दुसरीकडे, लीगल रीझनिंगमध्ये विद्यार्थ्यांना आधी पॅसेज समजून घ्यावा लागतो. नंतर त्यात दिलेल्या लॉच्या प्रश्नांचे तथ्य समजून घ्यावे लागते. हे तिन्ही सेक्शन मिळुन २० पॅसेज येतात, यात प्रत्येकी ५ प्रश्न येतात. तसेच, लीगल रिझनिंगच्या प्रश्नांशी संबंधित तथ्ये ५० ते ६० शब्दांची आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही विभाग गुणांच्या दृष्टीने पेपरच्या दोन तृतीयांश आणि वेळेच्या दृष्टीने ८० टक्के पेपर आहेत. पात्र उमेदवाराने १२० मिनिटांपैकी १०० मिनिटे या तीन विभागांसाठी द्यावीत.
वाचन संपादकीयपर्यंत मर्यादित ठेवू नये या विभागांच्या तयारीसाठी अग्रगण्य वर्तमानपत्रे वाचावीत. तसेच मॉक टेस्टची तयारी करावी. तुम्हाला जर वाचनाची सवय नसेल तर परीक्षेपूर्वी किमान १०० मॉक टेस्टची तयारी करावी. तुमचे वाचन पहिल्या पानावर आणि संपादकीयवर मर्यादित ठेवू नये, संपूर्ण वर्तमानपत्र वाचावे. कारण कोणत्याही क्षेत्रातील प्रश्न विचारले जाऊ शकतात.
सामान्यज्ञानाची चांगली तयारी करावी सामान्य ज्ञान विभागात उमेदवाराचे देश आणि जगाशी संबंधित ज्ञानाची चाचणी घेतली जाते. क्लॅट २०२४ साठी, ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या घटना काळजीपूर्वक वाचावे. त्यासाठी वर्तमानपत्र वाचावे लागतील. परिमाणात्मक तंत्रांसाठी, उमेदवारांना उताऱ्यातील डेटाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. यासाठी मॉक टेस्टचा सराव करावा.
डॉ शशांक सिंघल अॅडव्होकेट, अलाहाबाद हायकोर्ट, क्लॅट मेंटर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.