आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:‘पहिल्या दिवसाची बेचैनी दरदिवशी अनुभवा, तीच मेहनत करून घेईल’

इन्स्पायरिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज एवढ्या वर्षानंतर, हजारो धावा बनल्यानंतर...मला विश्वास होत नाही की, खेळता-खेळता मी किती पुढे निघून आलो... आजही मैदानावर जातो तेव्हा स्वत:ला एक क्लब क्रिकेटपटूच मानतो. मला आपली पहिली धाव काढायची आहे, हाच विचार करतो. हे अजूनही मी अनुभवतो याचा आनंद आहे. ‘वाह! मी एवढे सगळे केले,’ असा विचार करत नाही, त्याबद्दल आभारी आहे. पहिल्या दिवशी खेळाला जेवढा सन्मान देत होतो, तेवढाच मी आजही देतो. ज्या दिवशी हे सर्व अनुभवणे मी बंद करेण, त्या दिवसापासून माझ्यातील खेळ समाप्त होईल, हे मला माहीत आहे. जोवर मी पहिल्या दिवसासारखा अनुभव घेत राहीन, तोपर्यंत हा विचार माझ्याकडून कठोर मेहनत करून घेईल. हा अनुभव घेणे हे अद््भुत आहे.

जग तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, असे नाही. जग हे करणार. वारंवार करणार. मात्र तुम्हाला बदलायचे नाही. मला आठवते की, २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात क्षेत्ररक्षण करताना एक झुंड मला हैराण करत होती. जेव्हा अति झाले तेव्हा मी त्यांच्याकडे एक चुकीचा इशारा केला. पुढच्याच दिवशी सामनाधिकाऱ्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलवले. मला समजत नव्हते की, नेमके काय प्रकरण आहे. त्यांनी मला विचारले की, काल सीमारेषेजवळ काय घडले? मी म्हणालो, काहीच नाही. थोडीशी मस्करी सुरू होती. त्यांनी माझ्या दिशेने वर्तमानपत्र टाकले. त्यावर माझे खूप मोठे छायाचित्र होते. ते पाहून मला घाम फुटला. मी त्यांना विनंती करू लागलो. मला माफ करावे. कृपया, बंदी घालू नका. ते चांगले व्यक्ती होते. लहान वयात अशा चुका होतात, हे त्यांना समजले. मी त्या गोष्टींवर आता हसतो. चुकांना सुधारले जाऊ शकते. आता मी माझ्या कनिष्ठांना त्या चुकांबद्दल सुचित करतो, ज्या मी केल्या आहेत. माझ्यासारखी चूक करणाऱ्यांना मी पाहतो आणि ती सुधारली नाही तर हा माझा पराभव आहे. मी गप्प राहिलो, तर मी माझे काम करत नाही.’

जीवनात शिकणे कधीच बंद करू नये मी समजतो की, जीवन विशाल आहे. जेव्हा मी क्रिकेटपटू नव्हतो तेव्हाही माझे आयुष्य होते आणि क्रिकेटनंतरही ते राहील. जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आनंद घेऊ शकेन, एवढा मी स्वत:ला त्यालायक बनवू इच्छितो. क्रिकेट माझी ओळख बनावी, असे मला वाटत नाही. शिकणे मी कधीच बंद करणार नाही.

स्वत:शी प्रामाणिक राहणे अतिशय गरजेचे माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, मात्र मी तुम्हाला ठिकठिकाणी, मंदिरात जाताना दिसणार नाही. मी सेल्फ रिअलायझेशनमध्ये जगतो. शांत मेंदू माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. केवळ करायचे म्हणून मी कोणतेही काम करणार नाही. जोपर्यंत मी स्वत:शी प्रामाणिक आहे, तोपर्यंतच कोणतेही काम करू शकेन.

बातम्या आणखी आहेत...