आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका सर्वेक्षणात १४ वर्षांखालील शंभरपैकी नव्वद मुलांनी आम्हाला पालकत्वाची पद्धत समजत नसल्याचे सांगितले, अशी विचित्र गोष्ट समोर आली. म्हणजेच त्यांच्या पालकांच्या संगोपनाच्या पद्धतीबद्दल ते समाधानी नव्हते. त्या मुलांनी तीन गोष्टी सांगितल्या. कठोरपणा, भेदाभेद आणि मतभेद. कोणतीही चर्चा न करता आपल्यावर कठोरपणा लादला जातो, असे ते म्हणतात. भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण असा भेद केला जातो व यामुळेच आमचे पालकांशी मतभेद आहेत.
पालकांनी मुलांच्या संगोपनाच्या पद्धतीवर खूप गांभीर्याने विचार करून आवश्यकता असेल तर ती बदलली पाहिजे. मुलांच्या जेवणावर, त्यांच्या आवडीवर कडक नियंत्रण असावे. मला आठवते, माझ्या बायकोने लहानपणी दोन्ही मुलांना आवश्यक सवलती दिल्यानंतर दोन्ही वेळेला मसूर आणि रोटी खायचीच, असा कठोरपणा पाळला होता. असा काटेकोरपणा आज प्रत्येक घरात प्रत्येक आईने अमलात आणला पाहिजे. शिस्तीचा परिणाम मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होईल. :Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.