आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एलाना अब्रामसन, ब्रायन बेनेट
४ मार्च १९३३ ला जेव्हा २५ टक्के अमेरिकन बेरोजगार होते तेव्हा फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारले. कोट्यवधी लोक घाणेरड्या शहरांमध्ये राहत होते. आपल्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांच्या शेवटी त्यांनी संसदेमधून १५ विधेयक मंजूर केले. आर्थिक आणि कृषी क्षेत्रात सुधारणा केल्या. बेरोजगारांची मदत वाढवली आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचा पाया घातला. जवळपास नऊ दशकांनंतर आणखी एक डेमोक्रॅट अध्यक्ष जो बायडेन यांनी असाधारण संकटकाळात व्हाइट हाऊसची कमान सांभाळली. त्याचे सल्लागार म्हणाले की, बायडेन यांचे सर्वाधिक लक्ष साथीच्या नियंत्रणावर असेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे हादेखील त्यांच्या अजेंड्याचा मुख्य भाग आहे.
नवीन राष्ट्राध्यक्षांनाही जलवायू परिवर्तन, कृष्णवर्णीयांवरील अन्याय आणि विभागलेला देश पारड्यात पडला आहे. बायडेन आपल्या पहिल्या महिन्यातील कार्यकाळात रुझवेल्टच्या मॉडेलचा अभ्यास करत आहे. व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रॉन क्लेन यांनी टाइमला सांगितले की, “जितक्या मोठ्या समस्या असतील तितके अधिक प्रभावी उपाय करण्याचे ठरवले आहे.” पॅरिस जलवायू समझोता, जागतिक आरोग्य संघटनेत सामील होणे, मुस्लिम बहुसंख्य देशांवरील बंदी उठवणे यासारख्या निर्णयांमधून बायडेन यांचे कार्य प्रतिबिंबित होते. अलगाववादी प्रवृत्ती टाळण्याचे त्यांनी सूचित केले आहे.
बायडेनच्या डझनभर सरकारी अधिकाऱ्यांशी आणि बाह्य सल्लागारांशी झालेल्या संभाषणावरून असे दिसून आले की नवीन अध्यक्षांच्या १०० दिवसांच्या अजेंडाचा मुख्य विषय कोविड -१९ चा प्रसार थांबवणे आणि गरजू कुटुंबांना मदत करणे यावर आहे. बायडेन यांच्या १००व्या दिवशी ३० एप्रिलपर्यंत दहा करोड लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. शाळा सुरक्षितपणे उघडण्यालाही प्राधान्य आहे. लस वितरण आणि आर्थिक पॅकेजच्या निधीवाटपासाठी सरकारला विभाजित संसदेवर अवलंबून राहावे लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सिनेटमधील महाभियोगाची कार्यवाहीत इतर संसदीय कामे रखडतील. बहुतेक अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर व्यापक लसीकरणाद्वारे विषाणूचा धोका कमी झाला तर अर्थव्यवस्था स्वतःच उभी राहील. तथापि, सप्टेंबरपर्यंत साप्ताहिक बेरोजगारी भत्ता ३००-४०० डॉलरने वाढवून १४००० डॉलर्सपर्यंत वाढवला जात आहे. सल्लागारांचे म्हणणे आहे की राष्ट्राध्यक्षांच्या प्राधान्याने वर्णभेद आणि हवामान बदलाची समस्या समाविष्ट आहे. सरकारच्या आर्थिक पॅकेजमध्ये ब्लॅक लाइव्हज मॅटर चळवळीने उभी केलेल्या बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.
१०० दिवसांचे मास्क चॅलेंज
मोठ्या प्रमाणात लस लागू होण्यापूर्वी मास्कच्या बाजूने व्यापक मोहीम राबवली जाईल. बायडेन यांनी या मोहिमेमध्ये व्यापारी, धार्मिक नेते यांना जोडण्याची योजना आखली आहे. अमेरिकन लोकांना १०० दिवसांचे मास्क आव्हान सुरू करण्यासाठी अध्यक्ष थेट आवाहन करतील. त्याअंतर्गत त्यांच्या कार्यकाळातील पहिल्या तीन महिन्यांना किमान सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची विनंती केली जाईल. उद्रेक झाल्याच्या वर्षानंतर मास्क घालणे सोपे होणार नाही.
लसीकरणाच्या सर्व पैलूंवर राष्ट्राध्यक्षांची नजर
काही तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, अमेरिकेत विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सुमारे सात लाख इतकी असू शकते. या वेळी लसीकरणाची गती कमी आहे. बायडेन लसीकरणाला गती देतील. स्थानिक लोक लस वितरणाच्या दीड लाख कोटींच्या कार्यक्रमात भागीदार बनतील. राज्यांना लस पुरवल्यानंतर ट्रम्प यांनी डोस घेणे पूर्णपणे त्यांच्यावर सोडले होते. बायडेन यांची टीम परिस्थितीनुसार प्राधान्याने या लसीचे वितरण करेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.