आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:नातेसंबंधांचे महत्त्व समजावून सांगा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल आणि टीव्ही स्क्रीन हे आपल्या कुटुंबातील मुलांसाठी जगण्याचे आणि जीवनाचा आनंद घेण्याचे मुख्य साधन झाले आहे. सध्या तीन ते बारा वर्षांची मुले डिजिटल युगातील आहेत. ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आहेत, परंतु एक तोटा लक्षात ठेवला पाहिजे. कुटुंबीय मुलांशी संवाद साधत नसतील, वैयक्तिकरीत्या भेटत नसतील तर ही मुले यांत्रिक होतील. खरे तर कुटुंब जीवनात शिस्त आणते, आत्मविश्वास वाढवते, आपुलकी निर्माण करते आणि अस्थिरता दूर करते.

तंत्रज्ञानाव्यतिरिक्त या मुलांना वेळोवेळी संवेदनांशी जोडावे लागेल, म्हणून शास्त्रात लिहिलेले मंत्र त्यांना सांगा. मंत्रांची शक्ती त्यांच्या संवेदना जागृत करेल. आपण या मुलांना त्यांच्या प्रत्येक कामात तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, पण या मुलांना कोण समजावणार की, आपल्या प्रत्येक श्वासात आपल्या आई-वडिलांची धून असते. ही स्क्रीन लाइफ कुटुंबाच्या आपुलकीला तोडू नये. वेळीच त्यांना तंत्रज्ञानाशिवाय बनलेल्या नात्यांचे महत्त्वही समजावून सांगा. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...