आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:कुटुंब हे आपले मूळ आहे

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची ताकद आपले कुटुंब आहे. गेल्या दोन वर्षांत महामारीमुळे आपले जीवन आणि उपजीविका दोन्ही धोक्यात आले होते. आपल्याला जीव वाचवायचा आणि उदरनिर्वाहही करायचा आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपला सर्वात मोठा आधार, सर्वात मोठी ताकद कुटुंब ही आहे. प्रत्येकाला काळाच्या प्रवाहात प्रवाहित व्हावे लागते.

काळ बदलला आणि कुटुंबांचा आकारही छोटा होत गेला. एक काळ असा होता की प्रत्येक कुटुंबात आठ-दहा जण असणे सामान्य होते. हळूहळू ‘हम दो-हमारे दो’ ही पद्धत सुरू झाली आणि आता बहुतेक पालक ‘हम दो-हमारा एक’वर समाधानी आहेत. मग नोकरी-व्यवसायामुळे इच्छा नसूनही कुटुंबे विभागली गेली. मुले बाहेर पडली, पालक घरात एकटे राहिले. पण, संयुक्त कुटुंब ही आजही आपली गरज आहे. आता आपण एक आध्यात्मिक-संयुक्त कुटुंब तयार करूया. कुटुंबाशी भावनिकरीत्या जोडलेले राहा. कुटुंब ही आपली मुळे आहेत व मुळांशिवाय कोणताही वंशवृक्ष फुलू शकत नाही. हाच संकल्प जागतिक कुटुंबदिनी (१५ मे) करावा.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...