आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Fans Of Pension Path Are Protesting Instead Of Agnipath | Article By Niraj Koushal

विश्लेषण:अग्निपथऐवजी पेन्शनपथचे चाहतेच करत आहेत विरोध

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निपथविरोधात आंदोलन करणाऱ्या, रेल्वे जाळणाऱ्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या तरुणांना अग्निवीर बनायचे नाही. त्यांना फक्त ज्यात सरकार त्यांच्या सोयीची काळजी घेईल अशी नोकरी हवी आहे.

सैन्यातील भरती योजनेची कोणत्याही रोजगार हमी योजनेशी तुलना करणे अशोभनीय आहे. अग्निपथ या सरकारच्या बिगर-अधिकारी दर्जाच्या सशस्त्र दलांच्या भरतीसाठीच्या योजनेत अनेक नवीन आणि प्रशंसनीय सुविधा आहेत. त्याची योग्य अंमलबजावणी केल्यास लष्कराच्या तिन्ही दलांचे आधुनिकीकरण होईल आणि त्यामुळे त्यांच्यात तांत्रिकदृष्ट्या समृद्ध तरुणांची संख्या वाढेल. संरक्षण अर्थसंकल्पावर येणारा पेन्शनचा भार कमी करणे हादेखील त्याचा एक उद्देश आहे. मात्र, पुढील पंधरा वर्षे यात कोणतीही कपात करण्यास वाव नाही. पूर्वीच्या योजनांतर्गत नियुक्त केलेले लष्करी अधिकारी पुढील पंधरा वर्षे सेवानिवृत्त श्रेणीत येत राहतील आणि सेवानिवृत्तीनंतर ४० वर्षे किंवा त्याहूनही अधिक वर्षे निवृत्तिवेतन घेत राहतील. देशातील तरुणांना उत्पादनक्षम नोकऱ्यांची गरज असताना देशाची आधीच मर्यादित असलेली संसाधने पेन्शनवर खर्च व्हायला हवीत, या विचाराला विश्लेषक आणि विरोधी पक्ष पाठिंबा देत आहेत, हे पाहून आश्चर्य वाटते!

देशाच्या सीमांचे रक्षण करण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य आपली सशस्त्र दले करतात. यात नियुक्तीच्या योजनेची कोणत्याही रोजगार हमी योजनेशी तुलना करणे अशोभनीय आहे. आज जगातील अनेक देश त्यांच्या सैन्याचे आधुनिकीकरण करत आहेत, त्यांना तंदुरुस्त आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत बनवत आहेत. भारतानेही तेच करायला हवे. कारण देशाच्या सीमांचे रक्षण करणे हे दरवर्षी देशाच्या कामगार दलात सामील होणाऱ्या तरुणांच्या छोट्या वर्गाला रोजगार आणि पेन्शनची हमी देण्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहे.

अग्निपथ योजनेमुळे देशातील सैनिकांचे सरासरी वय ३२ वर्षांवरून २६ वर्षे होऊ शकते. अग्निवीर नावाच्या सैनिकांच्या नियुक्तीसाठी किमान वयोमर्यादा १७.५ वर्षे आहे. त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि साडेतीन वर्षांच्या सेवेसह चार वर्षांसाठी नियुक्त केले जाईल. यापैकी तीनचतुर्थांश अग्निवीर सेवा सोडतील तेव्हा त्यांच्याकडे ११ लाख रुपये असतील, तर प्रत्येक बॅचमधील एकचतुर्थांश अग्निवीर १५ वर्षांच्या सेवेसाठी नियुक्त केले जातील. चालू वर्षात अग्निपथ योजनेंतर्गत ४६ हजार अग्निवीरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. समीक्षक म्हणतात की, चार वर्षांनंतर ७५ टक्के किंवा सुमारे ३४,००० सैनिकांना सेवामुक्त केल्यास समाजाच्या लष्करीकरणाचा धोका आहे. सैन्यातून परतलेल्या तरुणांना कोणताही उत्पादक रोजगार मिळणार नाही आणि पेन्शनच्या सुरक्षेशिवाय ते हिंसाचाराचा मार्ग अवलंबतील, असेही त्यांना वाटते. १५ वर्षांच्या सेवेनंतर मुक्त झालेल्यांना कोणतीही अडचण येणार नाही, परंतु ४ वर्षांच्या सेवेनंतर मुक्त झालेल्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत आणि ते हिंसाचाराकडे झुकतील, हे सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे सिद्धांत मांडले जात आहेत. तथापि, सत्य असे आहे की, सध्याच्या योजनेंतर्गत १५ वर्षांच्या सेवेनंतर जे तरुण त्यांच्या तिशीत कार्यमुक्त होतील त्यांना ४ वर्षांत कार्यमुक्त होणाऱ्या तरुणांपेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण कोणताही नियोक्ता सांगेल की, १५ वर्षांच्या सेवेनंतर मुक्त झालेल्या व्यक्तीपेक्षा विशीतील तरुणाला अधिक सहजतेने नोकरी मिळू शकते. देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने करणाऱ्या तरुणांनी अद्याप अग्निपथ योजनेंतर्गत प्रशिक्षणही घेतलेले नाही, हे दुर्दैव आहे.

अशा प्रसंगी हरिवंशराय बच्चन यांची अग्निपथ ही कविता आठवते, त्यातील काही ओळी अशा - ‘ये महान दृश्य है| चल रहा मनुष्य है| अश्रु-स्वेद-रक्त से| लथपथ लथपथ लथपथ| अग्निपथ अग्निपथ अग्निपथ!’ परंतु, खेदाने म्हणावे लागते की, अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या, गाड्या जाळणाऱ्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या तरुणांना अग्निपथावर चालत अग्निवीर व्हायचे नाही. त्यांना फक्त ज्यात सरकार त्यांच्या सोयीची काळजी घेईल अशी नोकरी हवी आहे. ते अग्निपथ नव्हे, तर पेन्शनपथ शोधत आहेत. त्यांच्या या कृत्याचा निषेधही केला जात नाही, ही दुःखाची बाब आहे. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

नीरज कौशल कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक nk464@columbia.edu

बातम्या आणखी आहेत...