आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:थकव्याचे रूपांतर नैराश्यात होऊ नये

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणी कितीही मेहनती, उत्साही, कणखर असला तरी एक दिवस तो नक्कीच थकतो. त्याच्या स्वत:च्या थकव्याला मर्यादा असू शकतात. पण खचून न जाता जगायचं कसं? थकवादेखील दोन प्रकारचा असतो - एक शारीरिक, दुसरा मानसिक. विश्रांतीमुळे शारीरिक थकवा दूर होतो. हे केले नाही तर रोग शरीरात प्रवेश करण्यास तयार असतात. मानसिक थकवा समजुतदारीने दूर होतो. यात समज नसेल तर मानसिक थकवा नैराश्यात बदलू शकतो. मानसिक थकवा येण्याबाबत अधिक काळजी घ्या. आपल्या बाहेरच्या जगात घटना घडत राहतील. अनेक परिस्थिती आणि लोकांवर आपले नियंत्रण नसते. जगात घटना घडतात. भावना माणसाच्या आत घडतात आणि भावनांमुळे आपण अस्वस्थ होतो. बाहेरच्या लोकांमुळे आणि परिस्थितीमुळे फारसा त्रास होत नाही. या भावनादेखील मानसिक थकव्याद्वारे संचालित असतात. मानसिक थकवा दूर करण्यासाठी योग नावाचा एक सुंदर आराम आहे. योगासने करत राहावीत.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...