आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्टसेलरची शिकवण:आपल्यासाठी योग्य असलेली संधी शोधा

नील, पॅट्रिक व जोनास2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"हसल : द पॉवर टू चार्ज युवर लाइफ विथ मनी, मीनिंग अँड मोमेंटम” या पुस्तकाचे तीन लेखक आहेत - नील पटेल, पॅट्रिक व्लास्कोविट्स आणि जोनास कोफलर. हे बेस्टसेलिंग पुस्तक आपल्याला आपल्या अद्वितीय प्रतिभांशी जुळणाऱ्या संधी शोधण्यासाठी प्रेरित करते.

कृती योजना तयार करा स्वप्न पाहणे चांगले आहे, पण स्वप्नच पाहणे योग्य नाही. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हालाही काही तरी करावे लागेल. डे-ड्रीमिंग हा इंग्रजी शब्द आहे. यातील अडचण अशी आहे की, स्वप्ने पाहण्याने इतके समाधान मिळते की ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. काही तरी करा, कृती योजना करा.

यशाचे कौशल्य “हसल” हा शब्द, ज्यावर पुस्तकाचे शीर्षक आधारित आहे, त्याचा अर्थ आपल्या ध्येयासाठी जाणीवपूर्वक रणनीतीने कार्य करणे, मग ते भले अप्रत्यक्ष असो. यात आपण स्वतःला अशा स्थितीत आणतो, जिथे भाग्य, संधी, बदल वा इतरांच्या सहकार्याचा फायदा होऊ शकतो. यशासाठी हसलिंग हे एक आवश्यक कौशल्य आहे.

एका कामावर फोकस आपण हेही लक्षात ठेवावे की, एकाच वेळी सर्वकाही मिळू शकणार नाही. आपल्याला अनेक शक्यता व पर्यायांमधून निवड करायची आहे आणि आपले प्राधान्यक्रम ठरवायचे आहेत. त्यानंतर आपण आपली एक चांगली योजना बनवू शकतो. पुस्तकात म्हटले आहे की, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी आपल्याला नियमितपणे छोटी-छोटी जोखीम घ्यावी लागते.

मिनिमलिस्टिक अॅप्रोच हे अॅटाॅमिक हॅबिट्सचे युग आहे. स्मॉल इज ब्यूटिफुलबद्दल बोलले जात आहे आणि मिनिमलिस्टिक अॅप्रोच चलनात येत आहे. हे पुस्तकही आपल्याला एक सूत्र देते -स्माॅल एव्हरीडे विन्स. जो छोटी पावले उचलतो तो खूप पुढे जातो. गरज आहे ट्रॅकवर राहून एका वेळी एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची.

यशाचे सूत्र यशाचे सूत्र आहे : यश = हसल + लक + युनिक टॅलेंट. म्हणजे यश मिळवायचे असेल तर आपल्या बाजूने नियोजित आणि धोरणात्मक प्रयत्न करा, नशीब आपल्या बाजूने वळवा आणि आपल्या अद्वितीय प्रतिभेचा जास्तीत जास्त वापर करा. आपण जे करू शकता ते नक्कीच दुसरे कोणीही करू शकत नाही.

आपली प्रतिभा शोधा आपल्यापैकी अनेकांना आपल्या अद्वितीय प्रतिभेची जाणीव नसते, हे किती आश्चर्यकारक आहे? आपण खरोखर कशात सर्वोत्तम आहात हे आपल्याला माहीत आहे का? जे फक्त तुम्हीच करू शकता? आपण अद्याप ते शोधून काढले नसल्यास संकोच न करता प्रयोग करा. शिकणे आणि प्रयोगांनी भरलेले जीवन यशापासून दूर राहू शकत नाही.

आपल्या वेगळेपणाचा फायदा घ्यावा आपल्याला कुठे तरी सुरुवात करावीच लागेल. सर्वात यशस्वी व्यक्तीसुद्धा शून्यापासून सुरुवात करते. मग आपल्याला ज्या गोष्टी आवडतात आणि चांगल्या करू शकतो अशा गोष्टीपासून सुरुवात का करू नये? आपल्या वेगळेपणाचा फायदा घ्यावा. आपल्या बाजूने आपली गती आपल्या नशिबाला आकार देईल.