आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालमत्ता आणि वारसा यात फरक आहे. बहुतेक पुरुष आपल्या स्त्रीला मालमत्ता मानतात. स्त्रीमधील पंचतत्त्वांना अनेक पुरुषांनी उपभोगाचे साधन मानले आहे आणि ते त्यांना तशाच प्रकारे वागणूक देतात. त्यांना पृथ्वीप्रमाणे पायदळी तुडवले जाते, पाण्यासारखे वाहवले जाते, अग्नीत फेकले जाते, वाऱ्यासारखे उडवले जाते आणि आकाश म्हणजे ध्वनीत (गोंगाट) बुडवले जाते. आजकाल हे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी सहजतेने केले जात आहे. सोशल मीडियाचे सगळे ‘ज्ञानी’ सहा गोष्टींचा फायदा घेतात. सुज्ञ लोकांनी त्यांच्याबद्दल खूप सावध राहिले पाहिजे.
या सहा गोष्टी आहेत-
१. येथे शालीनता गमावण्याची भीती नाही, कारण डोळ्यात लाज नाही.
२. अश्लीलतेमध्ये गुंतण्याच्या गुप्त संधी सहज उपलब्ध आहेत.
३. मनाप्रमाणे मनोरंजन त्याच्या आडून भोग-विलास सहज उपलब्ध होतो.
४. एकमेकांवर राग काढणे सोपे होते.
५. स्त्री-पुरुषांची भांडणे म्हणजे जेंडर प्राॅब्लेम्स मांडण्याच्या भरपूर संधी मिळतात आणि
६. आपल्याला कळतही नाही व सोशल मीडिया वापरताना आपली अधीरता वाढते. या सर्व गोष्टी जीवनातील शांततेसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे सावध राहा. पंचतत्त्वे आपल्यात साधेपणा व सात्त्विकता वाढवण्यासाठी आहेत, दुर्गुणांच्या पोषणासाठी नव्हे.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.