आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Forest Ecosystems Need To Be Understood To Save Forests| Article By Dr. Nrupendra Nrup

यंग इंडिया:जंगले वाचवण्यासाठी फॉरेस्ट इको सिस्टिम समजून घ्यावी लागेल

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या तापमानामुळे जंगलांना आग लागण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास यंदा या घटनांना वेग येऊ शकतो. गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये जंगलाला आग लागण्याच्या २८१३ घटना घडल्या, या गेल्या १२ वर्षांतील सर्वाधिक आहेत. यावर्षी आतापर्यंत जंगलाला आग लागण्याच्या ३०० हून अधिक घटना घडल्या आहेत.

जंगलात आग लागणे ही सामान्य गोष्ट असली तरी बहुतांश घटनांमध्ये आग पसरणे आपोआप थांबते आणि नंतर हळूहळू शांत होते. जंगलातील आगीमुळे पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. जंगलाला लागलेल्या आगीची कारणे पाहूया. अग्नीला तीन गोष्टी लागतात - इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता. उन्हाळ्यात दुष्काळ शिखरावर असतो तेव्हा रेल्वेच्या चाकातून निघणारी ठिणगीसुद्धा आगीत बदलू शकते. कधी कधी आग नैसर्गिकरीत्या लागते. हे एक तर अति उष्णतेमुळे किंवा विजेमुळे होते. वीज पडणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे, पडणाऱ्या खडकांच्या घासण्यामुळे उद्भवणाऱ्या ठिणग्या, कोळशाच्या थराला लागलेली आग, तसेच सिगारेट-बिडी, वीज वाहिनी अशा मानवी कारणांमुळे निर्माण होते. जगाच्या ज्या भागात स्थलांतरित शेती केली जाते तिथे जंगले तोडली जातात आणि जाळली जातात, त्यामुळे आसपासची जंगलेही जळतात. पाइनच्या जंगलांना आग लागण्याची सर्वाधिक शक्यता असते, कारण पाइनची पाने आणि साल यांच्यापासून निघणारी राळ ज्वलनशील असते.

मात्र, जंगलात आगीमुळेच नुकसान होते, असे नाही. काही फायदेही आहेत. हे जैवविविधतेचे संरक्षण करण्यास, गवताळ मैदाने व पर्यावरणीय क्षेत्रांचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करते. नैसर्गिकरीत्या उद्भवणारा वणवा जुन्या वनस्पती साफ करून पोषक तत्त्व प्रदान करते. इतकेच नाही, तर या आगीमुळे सूर्यप्रकाश जंगलाच्या तळात पोहोचण्यास मदत होते, त्यामुळे छोटी झाडे व बियाणे वाढण्यास मदत होते.

जंगले वाचवायची असतील तर फॉरेस्ट इको सिस्टिम समजून घ्यावी लागेल. पाइनची जंगले असोत की इतर जंगले, पावसाच्या पाण्याची साठवण सर्वत्र व्हायला हवी. जंगलात आणि आजूबाजूला ओलावा असेल तर स्थानिक वनस्पती बहरतात. जंगलात आग लागण्याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक लोकांशी असलेला संपर्क तुटणे. वन कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळे लोकांचे जंगलावरील हक्क आणि संलग्नता संपुष्टात आली आहे. जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांचा लाकूड घेण्याचा अधिकार राखला गेला पाहिजे आणि त्यांना पर्यावरणाप्रती जबाबदार धरले पाहिजे, जेणेकरून आग लागल्यास ते विझवण्यास तयार होतील. याशिवाय, जंगलात आग लागल्यावर एक विशेष साधन वापरले जाते, ते तापमान, वाऱ्याचा वेग या बाबी तपासण्यास मदत करते. ठिणगी निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टी दूर व्हाव्यात, अशी व्यवस्था करावी. जंगलात ज्वलनशील पानांचा प्रादुर्भाव होता कामा नये, तसेच पाइनच्या सुयांसारख्या पानांचा पर्यायी वापर करण्यास सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. जंगलातील आग लवकरात लवकर आटोक्यात आणली नाही, तर त्यामुळे वनस्पती व जीवजंतूंचा नाश होत असल्याने त्याचा मोठा धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

नृपेंद्र अभिषेक नृप संशोधक आणि लेखक nripendraabhishek@gmail.com

बातम्या आणखी आहेत...