आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदेसेनेच्या बंडखोरीनंतर अनेक नेत्यांची युवा सेनेतील मुले बाहेर पडली. त्यामुळे नव्याने युवा सेनेची कोअर कमिटी करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील एकाही पदाधिकाऱ्याला स्थान मिळाले नाही.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सचिव वरुण सरदेसाईंनी दोन महिन्यांपूर्वी संघटना बांधणीसाटी दौरा केला. शिंदेसेनेत गेलेल्यांच्या जागा भरण्याचे काम सुरू झाले. यापूर्वी जालन्याचे जगन्नाथ काकडे पाटील हे मराठवाड्यातून सदस्य होते. त्यांच्या जागी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे यांना संधी जागा मिळेल अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही.
नेत्यांसोबत मुलेही गेली : अर्जुन खोतकरांचा मुलगा अभिमन्यू, प्रताप सरनाईकांचा मुलगा पूर्वेश, सदा सरवणकरांचा मुलगा समाधान, दादा भुसेंचा मुलगा आविष्कार शिंदेसेनेत गेले. अजूनही बंडखोरी होऊ शकते. या धाकापोटी फक्त अगदी जवळच्या कार्यकर्त्यांना कोअर कमिटीत घेण्यात आले असावे अशी चर्चा आहे. खैरेंच्या मुलाला स्थान मिळू नये, यासाठी जिल्ह्यातूनच मातोश्रीवर निरोप देण्यात आल्याची चर्चा आहे. घराणेशाही : विक्रांत जाधव, नीलेश महाले, सिद्धेश धाऊसकर, हर्षल काकडे, धनश्री कोलगे नवे सदस्य असून यात चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांतला संधी मिळाली आहे.
एकनिष्ठ राहणारच
आम्ही ठाकरे कुटुंबीयांशी एकनिष्ठ होतो आणि पुढेही राहणारच. जी जबाबदारी दिली जाईल, ती प्रामणिकपणे पार पाडणार. ऋषिकेश खैरे, युवा सेना उपसचिव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.