आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opinion
  • Four Serious Crises Before Biden; Epidemics, Economic Disasters, Racism And The Poison Of Political Enmity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:बायडेन यांच्यासमोर चार गंभीर संकटे; महामारी, आर्थिक आपत्ती, वर्णभेद व राजकीय वैराचे विष

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीतील अराजकानंतर नवीन अध्यक्षांकडून अमेरिकेच्या अपेक्षा

अनेक राष्ट्रप्रमुखांनी संकटाच्या वेळी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. अमेरिकेचे नवीन अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर चार संकटे आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम आहे. दुसरीकडे, लसीकरणाची मोहीम पद्धतशीरपणे सुरू नाही. विषाणूमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. एक कोटीहून अधिक अमेरिकन बेरोजगार झाले आहेत. दोनतृतीयांश मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. आठपैकी एकाला अन्न मिळत नाही. वर्णभेदाच्या आधारे समाज वाईटरीत्या विभागला गेला आहे. राजकीय वैराने लोकशाहीत अमेरिकनांच्या श्रद्धेवर विषारी परिणाम केला आहे. निवडणुकीत फसवणूक झाल्याच्या शक्यतेवर ट्रम्प यांच्या ८०% हून अधिक समर्थकांचा विश्वास आहे. बायडेन यांनी २० जानेवारीला सत्तासूत्रे स्वीकारताना आपल्या पहिल्या भाषणात या समस्या मान्य केल्या. त्यांनी देशाच्या जखमांवर मलम लावण्याचे संकेत दिले आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान बायडेन यांनी अमेरिकेचा आत्मा पुन्हा सचेतन करण्याची शपथ घेतली होती. हे खूप कठीण काम आहे. डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी संसद भवनात तोडफोड केल्यावर माजी राष्ट्रपतींविरुद्ध महाभियोगाची कारवाई सुरू आहे. १९८७ पासून बायडेन व्हाइट हाऊसमध्ये येण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण त्या स्वप्नापेक्षा वास्तव वेगळे आहे. तथापि, काही महिन्यांत नाट्यमय सुधारणा अपेक्षित आहेत. अमेरिकेला सर्वप्रथम विषाणूवर नियंत्रण मिळवावे लागेल. पोलिओ लसीकरण मोहिमेपेक्षा या लसीचा कार्यक्रम थोडा कमी चालला तरी लवकरच चांगले परिणाम दिसतील.

विषाणूवर नियंत्रण मिळवल्यास अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा आजची परिस्थिती वेगळी आहे. २०२० मध्ये सरकारच्या प्रचंड आर्थिक पॅकेजमुळे लोकांकडे खर्चासाठी पुरेसे पैसे आले. बँकिंग व्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. आर्थिक संकट व्यापक नाही, परंतु अनेक व्यवसाय आणि सेवांशी संबंधित कामगारांमध्ये ते जास्त आहे. स्थिती सामान्य झाल्यावर अशा सेवा आणि व्यवसाय पुन्हा सुरू होतील. बायडेन यांच्या टीमची १३.८८ लाख कोटी रुपयांचे आणखी एक पॅकेज देण्याची योजना आहे. अशा प्रकारे महामारीनंतर सरकारी मदत जीडीपीच्या २७% होईल. बायडेन यांच्याद्वारे लसीकरण, बेरोजगारी भत्त्यासाठी अधिक निधी व मुलांसाठी करात सूट याचा चांगला परिणाम होईल.

चार वर्षांत परदेशात अमेरिकेसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत. ट्रम्प यांना सत्तारूढ केलेल्या शक्ती भविष्यात दुसऱ्या राष्ट्राध्यक्षांसमवेत परत येऊ शकतात, असे परराष्ट्रांतील नेत्यांना वाटते आहे. त्यामुळे अमेरिकेने केलेले करार तात्पुरते मानले जातील. बायडेन यांना परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर अनेक अशक्य गोष्टी कराव्या लागतील. अण्वस्त्रांवरील नव्या करारासाठी रशियाच्या सहकार्याची आवश्यकता भासेल. मतभेद असूनही हवामान बदलाच्या मुद्द्यावर चीनचे सहकार्य महत्त्वाचे आहे. बायडेन यांंच्यासमोर अनेक अडचणी आहेत. त्यांच्या प्रस्तावांना रिपब्लिकन सदस्य विरोध करू शकतात. ट्रम्प सरकारने अमेरिकेच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी भावना भडकवल्या. बायडेन यांच्यापुढे पावलापावलावर कठीण आव्हाने आहेत.

ट्रम्प राजवटीत संस्था कमकुवत
ट्रम्प यांच्या कारकीर्दीत संस्था कमकुवत झाल्या. घोटाळ्यांवरील निर्बंध कमी झाले. ट्रम्प यांनी जाता जाता ज्यांना माफ केले त्यातील एका डॉक्टरने शेकडो ज्येष्ठांच्या डोळ्यावर विनाकारण उपचार केले. सरकारी अधिकाऱ्यांच्या लाॅबिंगवर बंदी घालणारा आपल्याच सरकारचा आदेश त्यांनी रद्द केला. इतर पक्षाचे सदस्य अमेरिकेसाठी धोकादायक आहेत, असे सुमारे ७०% अमेरिकन मानतात. ५०% लोकांना वाटते की ते पूर्णपणे दुष्ट आहेत. अशाच भावनांनी ट्रम्प यांचा सत्तेत येण्याचा मार्ग तयार केला होता.