आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाइम मॅगझिननेे ‘२०२३ वुमन ऑफ द इयर’ अवॉर्डची घोषणा केली आहे. हा अवॉर्ड ज्या महिलांच्या प्रयत्नांनी समान अधिकार मिळतात अशा महिलांना दिला जातो. या वर्षी टाइमने १२ प्रभावशाली महिलांना हा अवॉर्ड दिला आहे. वाचा यातील तीन महिलांची कहाणी, ज्यांच्या प्रयत्नांनी जगभरातील महिलांच्या जीवनावर परिणाम झाला.
मेगन रेपिनो पुरुष-महिला फुटबॉलपटू यांना समान शुल्क मिळाले मेगन रेपिनो अमेरिकेच्या सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू आहेत. मेगन यांना अमेरिकी महिला फुटबॉलर्सना पुरुषांच्या बरोबरीने वेतन मिळवून दिल्याबद्दल टाइमने वुमन ऑफ द इयरसाठी मेगन यांची निवड केली. मेगन यांनी फ्रान्समध्ये आयोजित २०१९ महिला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेला विजय मिळवून दिला होता. मात्र त्यानंतरही रेपिनो यांना समान वेतनासाठी संघर्ष करावा लागला. २०२२ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेत महिला व पुरुषांना समान वेतन देण्यासाठी समिती गठित केली. रेपिनो यांनी आपल्या प्रयत्नांनी कॅनडा, स्पेनसह इतर देशांच्या महिलांना समान वेतनाची मागणी करण्यासाठी प्रेरित केले.
रामला अली निर्वासित लोकांसाठी खेळताहेत बॉक्सिंग सौदी अरेबियातील बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेणारी रामला अली ही जगातील पहिली महिला आहे. निर्वासितांसाठी सतत आवाज उठवल्यामुळे टाइमने त्यांची वुमन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. २०१८ मध्ये रामलांनी सिस्टर्स क्लबची सुरुवात केली होती. हा एक नॉन-प्रॉफिट क्लब असून जो गरीब आणि वंचित महिलांना बाॅक्सिंगचे प्रशिक्षण देतो. रामला युनिसेफ यूकेच्या अॅम्बेसेडरही आहेत. त्या लहान असताना त्यांच्या कुटुंबीयांना सोमालियाहून पळून येऊन ब्रिटनमध्ये शरण घ्यावी लागली होती. त्यामुळे रामला निर्वासितांचे जीवन चांगले घडवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत.
ओलेना शेवचेंको रशिया व युक्रेन युद्धात दुर्बलांचा आवाज बनल्या ४० वर्षीय ओलेना शेवचेंकोंवर गेल्या पाच वर्षांत ७ वेळा हल्ला झाला. कारण त्या युक्रेनमधील महिला आणि समलिंगींचा आवाज बनल्या आहेत. टाइम मॅगझिनने त्यांचे हेच प्रयत्न बघून त्यांना वुमन ऑफ द इयर निवडले आहे. युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर शेवचेंको यांच्या ग्रुपने ट्रान्सजेंडर महिलांना फर्स्ट एड किट देण्यासाठी सुमारे ३३ कोटी रुपये फंड जमवला. शेवचेंको म्हणतात की, युक्रेनमध्ये रूढिवादी समूह नेहमीच एलजीबीटीक्यूवर पळून जाण्याचा आरोप करत आला आहे. त्यामुळे हे समुदाय युद्धात खूप सक्रिय आहेत हे दाखवणे हे त्यांचे ध्येय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.