आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधार्मिक अनुष्ठानात किती प्रदर्शन, दांभिकता आणि किती परमात्मा आहे हे शोधणे आता कठीण झाले आहे. आज कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला गेल्यावर तिथे गोंगाट दिसतो. पण, आज जे घडत आहे ते काही नवीन नाही. यापूर्वीही असेच घडले. श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन अशा प्रकारे केले आहे - नभ दुंदुभीं बाजहिं बिपुल गंधर्ब किंनर गावहीं। नाचहिं अपछरा बृंद परमानंद सुर मुनि पावहीं॥ आकाशात अनेक ढोल वाजत आहेत. गंधर्व आणि किन्नर गात आहेत. अप्सरांचे समूह नाचत आहेत. देव आणि ऋषी आनंदात आहेत. वाजवणे, गाणे आणि नाचणे या तिन्ही गोष्टी इथे घडत आहेत. आजही हे घडते. कधी कधी यासाठीच कार्यक्रम आयोजित केले जातात. पण, पुढे दोन गोष्टी लिहिल्या आहेत - देव आणि ऋषी आनंदाची प्राप्ती करत आहेत. आता आपण असे कार्यक्रम थांबवू तर शकत नाही. ते जनतेला आवडतात. पण, आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःला देव व ऋषी बनवून आनंद घेऊया. देवता पुण्याने घडतात. आपण अशा कार्यक्रमांना पुण्यकर्माच्या दृष्टिकोनाने जावे. चांगले काम पाहावे. मुनी म्हणजे मौन पाळणारा. कितीही गोंगाट असला तरी अशा कार्यक्रमांत आतील मौन साध्य करता येते. तरच आपण आनंद घेऊ शकू. ज्यांना नाचायचे, गायचे, वाजवायचे त्यांनी ते करावे, आपल्या आनंदात उणीव राहणार नाही.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.