आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • God And World Are Not Mutually Exclusive | Article By T. Vijayshankar Mehata

जीवनमार्ग:जग-परमात्मा परस्परविरोधी नाहीत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही ऐकले आहे की नाही, मात्र असे होते की कठपुतळी नाचवणाऱ्यांची बोटे आणि हात काही काळानंतर कठपुतळीच्या हाताने नाचू लागतात. म्हणजे जे कठपुतळ्यांना नाचवतात, कठपुतळ्या त्यांनाच नाचवू लागतात. या कठपुतळीचे नाव सध्याच्या काळात साेशल मीडिया आहे. जेव्हा तुम्ही त्यावर बोटे चालवता, तेव्हा वाटते तुम्ही चालवत आहात, काही वेळाने सोशल मीडिया तुमच्यावर नियंत्रण मिळवतो. हेही एक प्रकारचे जग आहे. येथे दोन सैन्ये काम करतात. एक आहे बायकॉट ब्रिगेड आणि दुसरी आहे, कसेही करून देवाला उतरवा. सध्या सोशल मीडियावर देवाचे एवढे प्रयोग होत आहेत, तेवढे इतिहासात झाले नसतील. त्याचा वापर वाईट नाही, जसे जग- परमात्मा परस्परविरोधी नाहीत. तसेच सोशल मीडिया आणि भक्तीत वाद नाही. हा मीडिया तुमच्या भक्तीला सहाराही देऊ शकतो, विकृतही करू शकताे. परमात्मा मिळवण्याच्या मार्गातील हा सुंदर टप्पा आहे. तो कुरूप करू नका.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...