आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुपारी तीन वाजता मुश्किलीने थोडेसे दिसत होते. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्त्यावर ५० मीटरवरचेही दिसत नव्हते. शनिवारी मी अंटालिया येथे जाणाऱ्या टॅक्सीला इशारा केला, ती पिवळ्या रंगामुळे दिसत होती. गाडीत बसल्यावर लक्षात आले, ती मर्सिडीझ होती, पण टॅक्सी होती. ड्रायव्हरने जाण्याचे ठिकाण विचारले, मला सीट बेल्ट बांधण्यास सांगितले. तीन दिवसांच्या अनुभवावरून मर्सिडीझचा ड्रायव्हर जास्त भाडे घेईल या विचाराने मनाने ताबडतोब संभाव्य भाड्याला चारने गुणायला सुरुवात केली आणि लिरा (स्थानिक तुर्की चलन) पाहण्यासाठी पर्समध्ये पाहिले. तुर्कीमधील काही जंक्शन्सचे सौंदर्य म्हणजे दोन सिग्नल आहेत. दोन्ही एका वेळी पिवळे आहेत. पहिला सिग्नल पिवळा असताना ड्रायव्हरने कसा तरी ओलांडला तर त्याने दुसऱ्या सिग्नलच्या आधी थांबले पाहिजे, कारण तो दुसऱ्या सिग्नलवर पोहोचेपर्यंत तो लाल होईल. त्या खड्डेमय रस्त्यावर १०० किमी प्रतितास वेगाने जाणारी टॅक्सी दुसऱ्या सिग्नलवर अचानक थांबली आणि मला धक्काच बसला. २५ वर्षांपासून या व्यवसायात असूनही ड्रायव्हरने मागे वळून ‘लाल सिग्नल असताना पुढे गेलो असतो तर त्याचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित झाला असता’, असे सांगत माफी मागितली. बुधवारी मला कळले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सर्व आरटीओ केवळ तीन महिन्यांत गंभीर रस्ते अपघात ३०% कमी करू शकले! तेव्हा मला अलीकडील दौऱ्यातील ही घटना आठवली. हे सर्व शक्य झाले कारण १ डिसेंबर २०२२ रोजी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सर्व आरटीओ एकत्र आले आणि त्यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांसह २४ तास मोहीम राबवली, तिथे सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणारे, लेन तोडणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त चुकीच्या बाजूने वाहने चालवणाऱ्यांवर तसेच बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. डिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने अनुकूल हवामानामुळे बहुतांश वाहने रस्त्यावर असतात. २०२१-२२ या वर्षाच्या या महिन्यांत या एक्स्प्रेस वेवर २१ गंभीर अपघात झाले, त्यामध्ये ३१ मृत्यू झाले, तर २०२२-२३ या कालावधीत १४ अपघातांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. आकडे त्यांचीच कहाणी सांगत आहेत. सर्व आरटीओ अधिकारी संपूर्ण एक्स्प्रेस वेवर गस्त घालत नाहीत, तर अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून ब्लॅक स्पॉट्स ओळखतात.
मी या घडामोडींचा सखोल अभ्यास केला तेव्हा जाणवले की, ठरलेल्या लेनवर चालणाऱ्या ट्रकचालकांवरही बारीक लक्ष ठेवून त्यांना मोठे यश मिळाले. ही मोहीम आणि कडक पहारा पुढील तीन महिने सुरू राहण्याची शक्यता आहे. आता माझी काळजी आहे,पावसाळा आल्यावर काय होईल? अधिकारी तेव्हाही त्याच ताकदीने काम करतील की, या तीन महिन्यांसाठी काही तंत्रज्ञान निश्चित करतील, जेणेकरून शिस्त आणण्यासाठी त्यांची सहा महिन्यांची मेहनत व्यर्थ जाऊ नये.
फंडा असा की, आकड्यांनी सर्व काही सांगावे असे वाटत असेल तर खंबीरपणा, सर्व अधिकाऱ्यांची सामूहिक शक्ती, नियमांची कडक अंमलबजावणी आणि तितकीच कठोर शिक्षा हवी.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.