आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Good Things Can Be In Garbage Or Poison, Find Them | Article By N Raghuraman

मॅनेजमेंट फंडा:चांगल्या गो​​​​​​​ष्टी कचऱ्यात किंवा विषातही असू शकतात, त्या शोधा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही फक्त २७ वर्षांचे असाल, तुमच्या हातात एमसीएची पदवी असेल आणि तुम्ही खासगी बँकेत सेल्स मॅनेजर झाला असाल, तरीही तुम्ही राज्य परिवहन मंडळात चालक होण्याचे स्वप्न पूर्ण कराल का? तुमचे उत्तर काहीही असो, पुण्यातील निगडी येथे राहणाऱ्या शीतल शिंदेने चार वर्षे खासगी बँकेत नोकरी आणि केबिनचा आनंद लुटल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालकाची नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शीतलबद्दल कळल्यावर मला जुनी म्हण आठवली- विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाशितं। अमित्रादपि सद्दृत्तं अमेध्यादपि काञ्चनम्॥ याचा अर्थ चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्यास आपण नेहमी तयार असले पाहिजे, मग त्या कुठून आल्या तरीही. करिअर बदलणारी शीतल महाराष्ट्रातील विविध डेपोंमध्ये नोकरीसाठी प्रशिक्षित होणाऱ्या १०० महिलांच्या पहिल्या तुकडीत आहे. २०१९ मध्ये तिची निवड झाली, पण कोविडमुळे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण ताकदीने सुरू झाले तेव्हा आता फक्त २ महिन्यांचे प्रशिक्षण उरले आहे आणि मार्च २०२३ पूर्वी ती तिच्या १८ बॅचमेट्ससह अधिकृतपणे चालक म्हणून कार्यभार स्वीकारेल, ही स्वातंत्र्यानंतरची महिलांची पहिली तुकडी आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकाशात आणि रस्त्यांच्या परिस्थितीत एकूण ३,००० तासांचे प्रशिक्षण घेतले, उदा. दिवसा आणि वाईट रस्ते व घाट इ.

आता दुसरे उदाहरण घ्या. इतर व्यवसायांप्रमाणेच कचरा संकलन व पुनर्वापर हे अनेक दशकांपासून पुरुषप्रधान, असंघटित क्षेत्र आहे. परंतु, सर्वच वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात महिला पायी कचरा उचलताना दिसतात. विशेष म्हणजे कचरा उचलणाऱ्यांमध्ये त्यांचा वाटा ४९% आहे, परंतु त्या पुरुषांपेक्षा ३३% कमी कमावतात. कारण त्या त्यांच्या घरापासून लांब जाऊ शकत नाहीत आणि उर्वरित कामासाठी लवकर परत येतात. त्यांच्यावर सर्वेक्षण करणाऱ्या चिंतन एन्व्हायर्नमेंट रिसर्च अँड अॅक्शन ग्रुप या संस्थेने त्यांची चळवळ वाढवण्यासाठी धर्मादाय संस्थेच्या मदतीने सायकलची व्यवस्था केली आहे.

या छोट्याशा बदलामुळे त्यांचे उत्पन्न वाढले. हळूहळू घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ बदलला, ज्याने पालिकांना महिलांचा समावेश करण्यासाठी व स्वयंसहायता गट तयार करण्यासाठी धोरणे तयार करण्याचे निर्देश दिले. या नियमांची अंमलबजावणी करणे हे वर्षानुवर्षे आव्हान असले तरी जिथे त्याची अंमलबजावणी झाली तिथे त्यांच्या कमाईत तफावत दिसून आली. दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील मटेरियल रिसायकलिंग सुविधेचे उदाहरण घ्या, तिथे परदेशी दूतावास आणि अनेक स्टार हॉटेल्स आहेत, त्याला कचरा वेचक एमआरएफ म्हणतात. येथे अनेक महिला २० हजार रुपये महिना कमावतात. बंगळुरूची एमआरएफ सुविधा ‘हसिरू दाला’ (कन्नडमध्ये अर्थ ग्रीन आर्मी) पाहा, तिथे ८०% कामगार महिला आहेत, त्यांना चांगल्या पगाराव्यतिरिक्त आर्थिक नियोजन, अमली पदार्थांचे सेवन, घरगुती हिंसाचार यांना सामोरे जाण्यास शिकवले जाते.

फंडा असा की, आपल्याला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टी कचऱ्यात किंवा काहींच्या मते तथाकथित ‘विषा’मध्ये पुरल्या जाऊ शकतात. त्यांची गरज असेल तर आपल्याला आपला आराम सोडून त्यांचा शोध घ्यावा लागेल.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...