आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्हाला इतरांपासून वेगळे व्हायचे असेल तर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणती भेट देणार ? काही क्षण विचार करा आणि पुढे वाचा... रमेश गिडरोनिया आणि राधेश्याम ठाकरे यांना काय भेट मिळाली असेल. ते भोपाळ येथील मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (मॅनिट)च्या केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये २५ वर्षे सेवा दिल्यानंतर या वर्षी ३० जून आणि ३१ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. मला त्यांचे पद माहीत नाही पण ते कदाचित चतुर्थ आणि तृतीय श्रेणीचे कर्मचारी आहेत. मॅनिटचे त्याच विभागातील दोन शिक्षक-प्रोफेसर आलोक मित्तल व त्यांची पत्नी असिस्टंट प्रोफेसर डॉ. ज्योती मित्तलने त्यांना काही वेगळी भेट देण्याचे ठरवले होते. त्यांनी दाेघांना १९ जून २०२२ राेजी भााेपाळवरुन दिल्ली आणि परतीचे खासगी विमानाचे तिकीट बुक केले, यात त्यांना विमानतळावर ५ तास घालवायला मिळणार हाेते. खासगी एअरलाइन्स प्रत्येक छोट्या सुविधासाठीदेखील एक्स्ट्रा चार्ज घेते. आधी या सर्व गोष्टी मोफत होत्या, त्यात सीट निवडण्यापासून ते भोजनदेखील येते. गिडरोनिया आणि ठाकरे जीवनात कधीच विमानात बसले नसल्याचे मित्तल दांपत्याला माहीत होते, त्यामुळे त्यांनी अतिरिक्त पैसा देऊन ितकीट बुक केले, जेणेकरून विंडो सीट बरोबरच दोन्हीकडच्या प्रवासात जेवण मिळावे. शिवाय ते खिडकीतून बाहेरचा आनंदही घेऊ शकतील. शिवाय त्यांना १५०० रुपये एक्स्ट्रा दिले आणि विमानतळ परिसरात खाण्या-पिण्याच्या किमती बाहेरच्यापेक्षा २००-३०० रुपयांनी वाढवून असतात, असे समजावूनही सांगितले. त्यामुळे हा पैसा दिल्याचे आणि खर्च करण्याचे सांगितले. मित्तल पैसे देताना म्हणाले, ‘हा पैसा बचतीसाठी नव्हे तर गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आहे.’ मित्तलने त्यांना या भेटीबद्दल सांगितले नव्हते, दोघांसाठी हे सरप्राइज होते. शिवाय दोघांचीही ट्रिप त्यांनी सुटीच्या दिवशी घडवून आणली. त्यानंतर मित्तलने दोघांना राउंड ट्रिपसाठी भोपाळ विमानतळावर सोडले आणि परत घ्यायला येण्याचे वचनही दिले. विमानतळावर पोहोचताच दोघे खुश झाले पण सर्व काही नवीन असल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हते. पहिल्यांदाच प्रवास करणारे लाेक दोन लोकांच्या नजरेतून सुटत नाहीत. एक चोर आणि दुसरे मोठ्या मनाचे चांगले लोक. सुदैवाने त्यांना दुसऱ्या नंबरच्या स्वभावाचे सज्जन भेटले. दिल्लीत राहणारे उद्योजक अनीष गाेयल यांनी दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले. अनिषचे वडील राजकारणात आहेत. अनीषने त्यांच्याशी हळूहळू बोलायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना या अनोख्या भेटवस्तूंबद्दल कळाले. त्यांनी मित्तलचा नंबर घेतला आणि पूर्ण अॅरेंजमेंट समजून घेतली. मित्तलने त्यांना दिल्लीमध्ये टी-१ टर्मिनलवर सोडण्याची विनंती केली. तेथून ते भोपाळसाठी रवाना होणार होते. गोयलने त्याचे वचन दिले त्याबरोबरच पाच तासांत दिल्ली दर्शन करून देणार असल्याचेही सांगितले. अनिषने आपल्या ऑफिसमध्ये फोन करून दोन कार मागवल्या. एक स्वत:ला परत जाण्यासाठी आणि दुसरी त्या लोकांना रायसिना हिल्स, इंडिया गेट, पार्लमेंट स्ट्रीट आणि राष्ट्रपती भवन दाखवून आणत परत टी-१वर सोडण्याचे सांगितले, जेथून ते परत जाण्यासाठी विमानात बसणार होते. भोपाळ विमानतळावर मित्तलने त्यांचे मोठा बुके देऊन स्वागत केले आणि दोघेही आनंदाने भारावून गेले.
एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.