आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिलिकॉन व्हॅली बँकेचे प्रकरण पूर्ण झाले. हे संकट अमेरिकेच्या टेक क्षेत्रातील आवडत्या बँकेत सुरू झाले, परंतु सरकारच्या बचावाचा सर्वाधिक फायदा मोठ्या टेक-कंपन्यांना झाला. आता बाजारपेठेत शांतता प्रस्थापित होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण, बेलआउट-पॅकेजेसवर आधारित प्रणाली आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जाते, हे त्यांना समजले पाहिजे. दोन दशकांपूर्वीपर्यंत भांडवलशाही चढ-उताराच्या चक्रातून जात असे. यामुळे बाजारपेठेतील प्रस्थापित शक्तींना अडथळा निर्माण होत असे व नवीन खेळाडूंसाठी जागा मिळत असे. पण, बँक संकटानंतर मदत पॅकेजचा सर्वाधिक फायदा मोठ्या कंपन्यांना झाला. भांडवलशाही अशी चालत नाही. टेक्सासमधील फोर्ट वर्थच्या महापौरांनी अलीकडेच म्हटले की, एसव्हीबी टेक उद्योगाऐवजी तेल उद्योगाला मदत करत असती तर सरकारने तिचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला असता का? मार्चमध्ये सरकारने एसव्हीबीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला तेव्हा मेगाकॅप स्टॉकची चांदी झाली. आज अमेरिकेतील पहिल्या पाच कंपन्या टेक कंपन्या आहेत आणि त्या एकत्रितपणे २०% शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करतात. १९६० च्या दशकानंतर कोणत्याही एका क्षेत्रातील हे सर्वाधिक काॅन्संट्रेशन आहे. दशकापूर्वी हा आकडा निम्माही नव्हता. बाजारातील स्पर्धात्मक भावना गमावणे हा बचाव-संस्कृतीचा दुष्परिणाम आहे. १९८० पासून ते सातत्याने वाढत आहे. फेडरल रिझर्व्हने १९८७ च्या क्रॅशनंतर बाजाराला बाहेर काढण्यासाठी हस्तक्षेप केल्यामुळे शेअर बाजाराने नाट्यमय तेजी अनुभवली. ती अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या निम्मी होती, पण २०२० मध्ये ती दुप्पट झाली. आपण कल्पना करू शकतो की, बाजार जितका अधिक विस्तारतो तितक्या स्पर्धेच्या अधिक संधी निर्माण होतात, पण अमेरिकेत असे होत नाही. दशकानंतरही आपले स्थान कायम राखणाऱ्या अमेरिकेतील पहिल्या दहा कंपन्यांची संख्या वाढली आहे. १९८० च्या उत्तरार्धात या तीन कंपन्या होत्या, २०१० च्या उत्तरार्धात त्यांची संख्या सहा झाली, तर जगातील इतर देशांमध्ये आजही स्पर्धेची भावना कायम आहे. २०१० च्या दशकात जपानच्या पहिल्या दहामध्ये फक्त दोन कंपन्या होत्या, युरोप आणि चीनमध्ये प्रत्येकी चार. जागतिक यादीत त्यापैकी फक्त दोनच होत्या - मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट. पण, आज अमेरिकेतील पहिल्या पाच सर्वात मोठ्या कंपन्या पुढील पाच मोठ्या कंपन्यांपेक्षा खूप मोठ्या आहेत. पहिल्या दोन कंपन्यांचा टॉप टेनमधील एकूण मार्केट कॅपपैकी निम्मा वाटा आहे. अॅपल पहिल्या क्रमांकावर आहे आणि दहाव्या स्थानावर असलेल्या युनायटेडहेल्थ ग्रुपपेक्षा सहापट मोठी आहे. तीन दशकांपूर्वी एक्सॉन नंबर १ आणि नंबर १० बेलसाउथच्या दुप्पट आकारापेक्षा जास्त होती. पूर्वी टेक-कंपन्या उलथापालथीला बळी पडत असत. संगणक युगाच्या प्रत्येक नव्या टप्प्याबरोबर नवी नावे दिसू लागली. आता टेक-जग एआय-क्रांतीकडे वळले आहे, परंतु मायक्रोसॉफ्ट व अल्फाबेटसारखी जुनी नावे अजूनही स्थान टिकवून आहेत. छोट्या कंपन्या व स्टार्ट-अप्सच्या खर्चाने मक्तेदारी कंपन्या मोठ्या होतात. चीनमधील सरकारी निर्बंधांमुळे अलीबाबा व टेन्सेंटसारख्या कंपन्या वाढल्या आणि घसरल्या. पण, अमेरिका म्हणजे चीन नाही. सरकारी बचावाच्या प्रयत्नांचा भांडवल वितरण व निर्णयशीलतेवर परिणाम होतो. बाजारदेखील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करणे थांबवतात व सरकार कशी मदत करेल याचा विचार करू लागतात. पण आज बचाव-संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी सरकार राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाई का करत नाही, असा सवाल अनेक भाष्यकार करत आहेत. यामध्ये रिअल इस्टेटसारख्या व्यावसायिक क्षेत्राला संधी दिसत असून तेही सरकारी मदतीसाठी पात्र असल्याचे सांगत आहेत. पण, सरकार हे नेहमीच करू शकत नाही, कारण भांडवलशाहीच्या केंद्रस्थानी स्पर्धा असते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
रुचिर शर्मा ग्लोबल इन्व्हेस्टर, बेस्टसेलिंग रायटर ruchir13@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.