आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Great Lessons For Us In What Is Happening In Sri Lanka | Article By Manoj Joshi

मुद्दा:श्रीलंकेत जे घडत आहे त्यात आपल्यासाठीदेखील मोठे धडे

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांपूर्वी राजपक्षे कुटुंब श्रीलंकेत चांगल्या परिस्थितीतून जात होते. माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे आता पंतप्रधान होते. धाकटा भाऊ गोटाबाया संरक्षण सचिवापासून राष्ट्रपती पदापर्यंत गेला. तिसरा भाऊ बासिल हा अर्थ मंत्रालयाचा कारभार पाहत होता. सर्वात मोठा भाऊ चामल यांना संसदेत सभापती बनवण्यात आले. अन्य नातेवाइकांनाही मुख्यमंत्री, हवाई दल संचालक अशी पदे देण्यात आली. मात्र, आज महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला असून ते त्रिनाकोमली येथील नौदल तळावर लपले आहेत. बेसिल यांनी राजीनामा दिला आहे. आणि गोटाबायांची अवस्था आता दयनीय झाली आहे.

राष्ट्रपतींनी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली असून सशस्त्र दलांना दिसताक्षणी गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजपक्षे कुटुंब देश सोडून जाऊ नये म्हणून आंदोलकांनी विमानतळ रोखून धरले आहे. वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेचे आर्थिक संकट अधिक तीव्र झाले. फेब्रुवारीपर्यंत त्याच्याकडे फक्त २.३१ अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा शिल्लक होता, तर त्याच्याकडे १३ अब्ज डाॅलर कर्ज होते. श्रीलंकेवर आशियाई विकास बँक, जपान, चीन आणि इतरांचे दायित्व बाकी होते. परिणामी, आयात करण्यात आलेले इंधन, अन्न आणि औषधे यांची तीव्र टंचाई निर्माण झाली. कोलंबोमध्ये निदर्शने सुरू झाली. ३ एप्रिल रोजी मंत्रिमंडळातील सर्व २६ सदस्यांनी राजीनामा दिला आणि पंतप्रधानांना एकटे सोडले. त्यानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वीपर्यंत राजपक्षे कुटुंबीयांकडून आंदोलकांना बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रयत्न सुरू होते, तर तोपर्यंत आंदोलन अहिंसक राहिले होते. सरकारला वाटले की, आंदोलक माघार घेतील, पण ही चाल उलटली. आंदोलन चिघळले.

महिंदा राजपक्षे हे २००५ ते २०१५ पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांचा कार्यकाळ लोकप्रिय ठरला. त्यांनी श्रीलंकेतील ३० वर्षांचे गृहयुद्ध एलटीटीई या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करून संपवले. पण, या प्रक्रियेत राजपक्षे यांनी सर्व न्यायिक मानके रोखून धरली. शेकडो तामिळ टायगर्स मारले गेले, इतकेच नाही, तर एलटीटीईचे नेते व्ही. प्रभाकरन यांचा एकुलता ११ वर्षांचा मुलगाही सुटला नाही. भारताने १९८७ ते १९९० पर्यंत एलटीटीईशी लढा दिला, परंतु १९९१ मध्ये एलटीटीईने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केल्यानंतर स्वतःला दूर केले. राजपक्षे यांनी लोकशाही मानकांची पर्वा न करणारा नायक अशी आपली प्रतिमा कोरली होती. त्यांनी बहुसंख्यवादी राजकारणाचा पाठपुरावा केला आणि ७० टक्के सिंहली बौद्धांच्या पाठिंब्याने तामिळ आणि मुस्लिम अल्पसंख्याकांवर आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केले. विरोधी आवाजांबद्दलचा त्यांचा प्रतिकूल दृष्टिकोनही दिसून आला, माध्यमांवर अंकुश ठेवला गेला आणि न्यायबाह्य हत्यांचे प्रमाण वाढले.

या काळात राजपक्षे यांनी त्यांच्या भव्य योजनांसाठी क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतले. हंबनटोटा बंदर, क्रिकेट स्टेडियम आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. नंतर कोलंबो हार्बर दक्षिण कंटेनर टर्मिनल आणि कोलंबो-काटुनायके एक्सप्रेस वे देखील बांधले. चीनने श्रीलंकेला भरपूर कर्ज दिले आणि त्यांच्या कंपन्याही श्रीलंकेतील बांधकामात गुंतल्या. हळूहळू श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा रिकामा होत गेला. सिरिसेना यांनी २०१५ मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकली, परंतु राजपक्षे कुटुंब २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर आले. २०२०-२१ मध्ये कोविडने श्रीलंकेची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली, हे त्यांचे दुर्दैव होते. त्यांचा पर्यटन उद्योग कोलमडला. रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या. राजपक्षे यांच्या चुकीच्या कारभारामुळे आगीत आणखीनच भर पडली. आज श्रीलंकेत जे काही घडत आहे त्यात आपण आणि जगासाठी खूप धडे धडे दडलेले आहेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

मनोज जोशी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे प्रतिष्ठित फेलो

बातम्या आणखी आहेत...