आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Growth Rate Statistics Are A Lesson For Policy Makers| Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:विकास दराची आकडेवारी हे धोरणकर्त्यांसाठी धडे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक लोकशाहीत हे थोडे अवघड काम आहे, परंतु प्रत्येक सरकारने अर्थव्यवस्थेचे अंदाज आणि त्यातून येणारा डेटा न घाबरता शिकण्याच्या भावनेने घेतला पाहिजे. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी जीडीपी विकास दराचे आकडे आले आहेत. आत्ममुग्ध होऊन बघितले तर जगातील इतर विकसित देशांपेक्षा ते चांगले आहेत, पण शिकण्याच्या दृष्टीने बघितले तर त्या देशांशी तुलना करण्याचे कारण नाही, कारण आज एक मोठा वर्ग मूलभूत गरजांसाठी झगडत आहे. त्याचप्रमाणे भांडवली गुंतवणुकीत वाढ झाली, ही आनंदाची बाब आहे, पण आजही कोरोनाचा फटका बसल्याने सेवा क्षेत्रातील, विशेषत: व्यापार, हॉटेल आणि उपभोगातील वाढही कोरोनापूर्व दरापेक्षा खूपच कमी आहे.

मॅन्युफॅक्चरिंग आणि रिअल इस्टेटमध्ये तेजी आली आहे. आपण सेक्टरवाइज ग्रॉस व्हॅल्यू-अॅडेडचे (जीव्हीए) निकष पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होईल की, ही वाढ इंग्रजी ‘के’ अक्षराच्या आकाराची आहे. म्हणजेच काही क्षेत्रे वाढत आहेत, तर काही खूप खाली जात आहेत. सरकारसाठी सल्ला असा आहे की, असा विकास अर्थव्यवस्थेत गरिबी-श्रीमंतीची दरी वाढत असल्याचे निदर्शक आहे. २०१९-२० या वर्षाच्या तुलनेत दरडोई खासगी अंतिम उपभोग खर्च (पीएफईसी) आजही कमी आहे. केवळ भांडवली गुंतवणुकीला वृद्धी-इंजिन मानण्यापेक्षा खालच्या, निम्न-मध्यम आणि मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा आला पाहिजे आणि ते निर्भयपणे खर्च करतील, असा विचार केला पाहिजे. तसेच महागाई कमी करणे हे पहिले प्राधान्य असायला हवे. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच म्हटले आहे की, कोविडपूर्व आर्थिक दिशा मिळण्यासाठी १२ वर्षे लागतील, हे विसरू नये.

बातम्या आणखी आहेत...