आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Happiness And Sadness Are The Seeds That We Sow | Article By Pt. Vijayshankar Mehta

जीवनमार्ग:सुख-दु:ख ही आपणच पेरलेली बीजे

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुख-दु:खातून माणूस कधीच बाहेर पडू शकत नाही, कारण स्वतःच्या दुःखात आणि अनेक प्रसंगी दुसऱ्याच्या सुखात दुःखी राहणे हा त्याचा स्वभाव असतो. लक्षात घ्या, तुम्ही आनंदात असता तेव्हा अनेक नाती तयार होतात आणि दुःखात असता तेव्हा अनेक देवदूतही गायब होतात. आपला प्रयत्न सर्वकाळ सुखासाठीच असतो, मग आपण दु:खाशी मैत्री करू शकत नाही. आपण आयुष्यात अनेक लोकांचे ऐकतो, तर मग काही वेळा दु:खाचेही काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक वेळी दु:ख हेच सांगेल की, आम्हाला सोबत घेतल्याशिवाय आयुष्याचा प्रवास होणार नाही. म्हणून आयुष्यात आनंद येतो तेव्हा त्या आनंदाला टोकावर घेऊन जा आणि दु:ख येते तेव्हा त्याला खोलवर घेऊन जा. आनंददायी परिस्थिती पूर्ण आनंदाने जगा आणि वेदनादायक परिस्थिती पूर्ण सखोलतेने समजून घ्या. ही दोन बीजे आहेत. जे बीज पेराल तेच उगवेल. सुख व दु:खाचे बीज वेगळे असावे. या दोन्हींची कधीही भ्रूणहत्या होत नाही. सुख व दु:ख ही दोन्ही आपणच पेरलेली बीजे आहेत, त्यामुळे आपल्या दुःखासाठी इतरांना दोष देण्याची सवय सोडा.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...