आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही लोकांचे चेहरेदेखील हृदयाच्या पुस्तकासारखे असतात. श्रीराम त्यापैकी एक होते. श्रीराम आत आणि बाहेर १००% सारखेच राहिले आणि म्हणूनच त्यांच्या जीवनात आपुलकीचे शिखर दिसते. अयोध्येला आल्यानंतर ते सर्व लोकांना भेटत होते तेव्हा संपूर्ण शहर त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आतुर झाले होते. तुलसीदास रामाने तेव्हा काय केले याचे प्रतीकात्मक दृश्य लिहितात- ‘अमित रूप प्रगटे तेहि काला। जथा जोग मिले सबहि कृपाला।।’ त्या वेळी दयाळू श्रीराम असंख्य रूपांत प्रकट झाले आणि यथायोग्य सर्वांना एकत्रच भेटले. तर्काच्या दृष्टिकोनातून या दृश्यावर विश्वास बसत नाही, पण भावनेने विचार केला तर श्रीरामाची एक वेगळी शैली होती. ते सर्वांशी प्रेमाने वागायचे आणि कोणालाही भेटताना त्यांच्यात उत्साह आणि ऊर्जा असायची. उत्साहाला ऊर्जेचा आधार द्यावा लागेल आणि ऊर्जेत उत्साह नसेल तर ती चंचल होऊन अस्वस्थ होईल, हे शिकायला हवे. श्रीराम ज्याला भेटायचे त्याला खूप आनंद व्हायचा. आनंदाला कालमर्यादा नसते, हे त्यांनी शिकवले. आपण आनंदी राहू, असा रोजचा प्रस्ताव असावा. त्याला दैनिक संकल्प म्हणतात. हे दृश्य पाहून आपणही ठरवले पाहिजे की, आपण कोणालाही भेटताना मनापासून, पूर्ण उत्साहाने आणि ऊर्जेने, आनंदाने भेटू.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.