आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • 'Har Ghar Tiranga' Will Be Another Masterstroke Of Prime Minister Narendra Modi| Article By Sanjay Kumar

मास्टरस्ट्रोक:पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक ठरेल ‘हर घर तिरंगा’

विश्लेषण14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक भारतीयाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या मोहिमेला ‘हर घर तिरंगा’ असे नाव दिले आहे. हा मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक ठरेल. त्यामुळे विरोधी पक्ष आणखी बॅकफूटवर येतील. ते त्याला विरोध करू शकत नाहीत किंवा पूर्ण समर्थनही करू शकत नाहीत. विरोध करणे म्हणजे देशद्रोही म्हटले जाण्याचा धोका पत्करणे, तर समर्थन करणे म्हणजे मोदींच्या निर्णयाशी सहमत होणे. आज विरोधी पक्ष ज्याद्वारे ते सर्वसामान्यांच्या भावनांशी जोडले जातील असा मुद्दा शोधण्यासाठी धडपडत आहेत. अशा स्थितीत त्यांना ना देशद्रोही म्हणून घेणे आवडेल, ना मोदींच्या समर्थनार्थ उभे राहता येईल. सार्वजनिक ठिकाणी भारतमाता की जय म्हणणे किंवा राष्ट्रगीताचा आदर करणे यांसारखी अनेक आवाहने मोदींनी यापूर्वी केली आहेत. जनभावना आपल्या बाजूला वळवण्यासाठी अत्यंत हुशारीने राष्ट्रवादाचा वापर करण्यात भाजप पटाईत झाला आहे.

अशा आवाहनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही किंवा सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होणार नाही, पण सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रीय भावना निश्चितच दृढ होते. खरे तर आज भाजपने राष्ट्रवादी भावनेवर मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. २०१४ पासून भाजप देशात आपला जनाधार वाढवत आहे. यादरम्यान त्यांनी लोकसभेच्या दोन निवडणुका बहुमताने जिंकल्याच, पण अनेक राज्यांत सत्ताही मिळवली. २००९ मध्ये भाजपचा राष्ट्रीय मतांचा वाटा १८.६ टक्के होता, तो २०१९ मध्ये ३७.४ टक्के म्हणजे जवळपास दुप्पट झाला. अलीकडच्या काळात भारत माता की जयच्या घोषणेवरही उलटसुलट मते समोर आली आहेत. भारत माता की जय म्हणण्यास नकार दिल्याबद्दल लोकांना फटकारले गेले आणि मारहाणही झाली. महाराष्ट्राचे आमदार वारिस पठाण यांना भारत माता की जय न म्हटल्याने विधानसभेतून एकमताने निलंबित करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी यासंदर्भात म्हटले होते की, लष्करी भारताच्या उभारणीसाठी या घोषणेचा गैरवापर केला जात आहे.

अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने लोकनीती-सीएसडीएसने केलेल्या अध्ययनात आढळले की, भारत माता की जयच्या आवाहनाला भारतीयांचा चांगलाच पाठिंबा आहे. सर्वेक्षणात सुमारे ५०% लोकांनी सांगितले की, जो कोणी ही घोषणा देण्यास नकार देईल त्याला शिक्षा व्हायला हवी. फक्त २८% असहमत होते. राष्ट्रगीताला असेच समर्थन सर्वेक्षणात आढळून आले, त्यामध्ये सुमारे ५९% लोकांनी सांगितले की, जे राष्ट्रगीतादरम्यान त्यांच्या जागेवरून उठत नाहीत त्यांना शिक्षा व्हायला हवी. भाजपचे वैचारिक वर्चस्व असे आहे की, कोणत्याही विरोधी पक्षाने कलम ३७० रद्द करणे आणि अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला विरोध करण्याचे धाडस केले नाही. उलट बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला. या घडामोडींमुळे भारतीय राजकारणात आमूलाग्र बदल घडून आला आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी केंद्रात आज कोणीच उरलेले नाही. निश्चितच काही प्रादेशिक पक्ष अजूनही राज्यांमध्ये सत्तेत आहेत, पण आता त्यांनाही राष्ट्रवादी अजेंड्याला आव्हान देणे कठीण जात आहे.

२०१४ पासून भाजपने हिंदी पट्ट्यात आपले स्थान खूप मजबूत केले आहे. शहरी मतदार कायम ठेवताना भाजपला आता ग्रामीण मतदारांचाही मोठा पाठिंबा मिळाला आहे. राष्ट्रवादी राजकारणाला देशवासीयांनी दिलेली मान्यता म्हणूनही तुम्ही याकडे पाहू शकता. हर घर तिरंगा भाजपला आपली पोहोच आणखी वाढवण्यास मदत करणार आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) संजय कुमार प्राध्यापक आणि राजकीय भाष्यकार sanjay@csds.in

बातम्या आणखी आहेत...