आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस फंडा:हस्तमुद्रा ठेवेल निरोगी आणि तंदुरुस्त

टीम मधुरिमा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाकिनी मुद्रा तळव्यांना हृदयचक्राजवळ एकमेकांसमोर आणा. उजव्या हाताचा अंगठा(अग्नितत्त्व), तर्जनी (वायुतत्त्व), मध्यमा(आकाशतत्त्व), अनामिका (पृथ्वीतत्त्व)आणि करंगळी (जलतत्त्व) या बोटांना डाव्या हाताच्या अग्राजवळ आणा. बोटे पसरलेली राहतील. चार बोटे समोरच्या बाजूला, अंगठा वरच्या बाजूला असावा. तळवे एकमेकांपासून दूर असावेत. अग्रभाग जमिनीला समांतर आणि कोपर बाहेरच्या बाजूला असावे. पाठीचा कणा सरळ ठेवावा.

सरावाची वेळ पहाटे ३ ते ५ दरम्यान मुद्रेचा सराव केल्यास सखोल ध्यानात जाण्यास मदत होते. जाणून घ्या फायदे या मुद्रेच्या सरावामुळे शरीरातील पंचतत्त्वाचा समतोल साधला जातो. अजना चक्र उत्तेजित होते. बुद्धी आणि मनाची शक्ती वाढते. एकाग्रता, तर्कशक्ती सुधारते. प्रदीर्घ सरावाने मन:शांती लाभते. अाज्ञाचक्राच्या सक्रियतेमुळे विचारांना स्पष्टता मिळते. ही मुद्रा निद्रानाश असलेल्या लोकांवर उपचार करण्यास मदत करते.

रुद्र मुद्रा दोन्ही हातांच्या तर्जनी,अनामिका आंगठ्याच्या अग्रावर ठेवा. तीन बोटे एकमेकांच्या संपर्कात असल्याची खात्री करा. मध्यमा आणि करंगळी सरळ ठेवून बाहेरच्या बाजूने पसरवा. तळहातांच्या मागचा भाग गुडघ्यावर ठेवा. पाठ सरळ ठेवा, डोळे बंद करा आणि सामान्यपणे श्वास घ्या. सरावाची वेळ हे रिकाम्यापोटी, जेवणानंतर तासाभराने करता येते. सूर्याेदयाच्या वेळी केली तर खूप प्रभावी मुद्रा आहे.

जाणून घ्या फायदे रुद्रमुद्रा पोटाचे अवयव निरोगी ठेवण्यास मदत करते. पचन सुधारण्यास मदत होते. आत्म-मूल्य वाढवते आणि आत्मविश्वास वाढवते. ही एक स्फूर्तिदायक मुद्रा आहे म्हणून सुस्ती आणि आळस दूर करण्यासाठी याचा सराव केला जातो. ही नैराश्यावर उपचार करण्यातदेखील मदत करते.

शंखमुद्रा उजव्या हाताची चारही बोटे डाव्या अंगठ्याभोवती गुंडाळा. डाव्या हाताच्या तर्जनीला डाव्या हाताच्या अंगठ्याच्या टोकाजवळ आणा. डाव्या हाताच्या तीन बोटांना उजव्या हाताच्या मागच्या बाजूला आणा. या मुद्रेला नाभी समोर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. सरावाची वेळ... सूर्योदयावेळी आवाजाची गुणवत्ता सुधारू इच्छिणाऱ्यांनी शंखमुद्रेचा दररोज सराव करावा.

जाणून घ्या फायदे ज्यांना आवाजाची गुणवत्ता,उच्चार सुधारायचे आहेत त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर. ही मुद्रा थायरॉइड ग्रंथी सक्रिय करते. चयापचय सुधारते.चरबीची निर्मिती कमी करते. टॉन्सिल्स साठीही एक उपचारात्मक मुद्रा आहे. शंखमुद्रेचा सकारात्मक प्रभाव पडल्यामुळे मूत्रपिंडाचे आरोग्य राखण्यास मदत होते. ज्या लोकांना नेहमी तापाची लक्षणे जाणवतात ते आराम मिळवण्यासाठी या मुद्रेचा सराव करू शकतात. रॅशेस, त्वचेची जळजळ, खाज सुटणे इत्यादी अॅलर्जींवर मात करता येते.

बातम्या आणखी आहेत...