आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:पूर्ण श्रद्धा असणे ही आत्मविश्वास वाढवण्याची पहिली पायरी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह सोहळ्याचे पहिले निमंत्रण देवाला द्यावे, अशी प्रत्येक हिंदू कुटुंबाची श्रद्धा असल्याने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या कुटुंबातील एका विवाहासाठी ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. उज्जैन येथील चिंतामण गणेश मंदिरात निमंत्रणाची पहिली पक्षिका देण्याची परंपरा आहे, म्हणून मी तिथे गेलो आणि विवाह सोहळा निर्विघ्न पार पडावा, अशी प्रार्थनाही केली. मंदिरातील गणेशमूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. महाकालेश्वर मंदिरापासून ७ किमीवरील हे मंदिर प्रसिद्ध षटविनायकांपैकी एक आहे आणि तिथल्या गणेशाला चिंताहरण म्हणजेच चिंता दूर करणारादेखील म्हणतात. मी पूजेसाठी वाट पाहत असताना मला समोर एक कुटुंब दिसले. ते एका दहा वर्षांच्या मुलाला चिंतामणी (भगवान विष्णूचे एक नाव) किती शक्तिशाली आहे हे सांगत होते. तो देवाकडे हवे ते काही मागू शकतो, असे त्याला सांगण्यात आले. मुलगा लगेच म्हणाला, मला दीडशे रुपये हवे आहेत! कुटुंबीय हसले. मला वाटले, मुलाला मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या दुकानातून एखादे स्मृतिचिन्ह घ्यायचे असेल आणि पालकांनी ते खरेदी करून मुलाला देण्यास नकार दिला असेल.

मंदिराच्या आवारात मला एक मल्याळी माणूसही दिसला, तो केळीच्या पानावर श्रीगणेशाला नैवेद्य दाखवत होता. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये केरळी लोक ओणम संध्याकाळच्या जेवणासाठी अनेक पदार्थ तयार करतात. राजा महाबली यांच्या नगरागमनाचा आनंद साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. एका संध्याकाळी मित्र आणि नातेवाइकांसह एकत्र मेजवानी हे ओणम वैशिष्ट्य आहे. एवढ्या मोठ्या मेजवानीसाठीही पहिले आमंत्रण देवालाच द्यायला हवे, अशी त्या माणसाची श्रद्धा होती. त्याने वाढलेल्या अन्नात आयुर्वेदाच्या तत्त्वांशी सुसंगत गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा मूलभूत चवींचा समतोल होता. प्रत्येक पदार्थ अगदी थोड्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की, देव खरोखरच मेजवानीसाठी आला तर ते त्याच्यासाठी कसे पुरेल? पहिला पदार्थ वाढल्यानंतर एका मुलाला ते खाण्यासाठी बोलावण्यात येत असे आणि असे मानले जात होते की मुलाच्या माध्यमातून देव स्वतः खातो. पण, आजकाल बहुतेक भाविक हे खाण्यासाठी मित्र किंवा कुटुंबीय घेऊन येतात.

पूजेची पाळी आल्यावर मी आत गेलो. प्रदक्षिणा करून परत आलो तेव्हा मला केळीच्या पानांवर ठेवलेले खाद्यपदार्थ संपल्याचे दिसले आणि १५० रुपये मागणारा मुलगा ते खात होता. मग मला आठवले की, मी काही अर्पण केले नव्हते, म्हणूनच माझा आत्मविश्वास कमी-जास्त होत होता आणि मला त्याची सर्वात जास्त गरज असे तेव्हा मला तो माझ्याकडे राहत नसे. मी पुन्हा डोळे मिटले, लहान मूल झालो आणि देवाला शरण गेलो. माझ्यासोबत आलेला मित्र अद्याप गप्प होता, पण आता तो म्हणाला, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. हे ऐकून माझे नकारात्मक विचार नाहीसे झाले आणि मला वाटले की, भगवान चिंतामणी स्वत: त्यांच्या माध्यमातून माझ्याशी बोलत आणि आश्वासन देत आहेत.

फंडा असा ः आपण विश्वासाने श्रद्धेला स्वतःला समर्पित केले तर आपल्याला जे कठीण वाटले होते ते करण्यासाठी गूढ विश्वास (नवा आत्मविश्वास) विकसित येतो. आपल्या देशात अशा विश्वासांची कमतरता नाही, याचा मला अभिमान आहे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...