आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • High Cholesterol Risk In Winter, 42% Higher Chance Of Heart Disease, One Apple A Day, 50 Minutes Of Vigorous Exercise A Week Beneficial

संशोधन:हिवाळ्यात कोलेस्टेरॉलचा मोठा धोका, हृदयविकाराची शक्यता 42% जास्त, रोज एक सफरचंद, आठवड्यातून 50 मिनिटे जोमाने व्यायाम लाभदायक

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगण्यासाठी हिवाळा हा आरोग्याचा ऋतू असला तरी हृदयसंबंधी आजारांसाठी तो अत्यंत घातक असतो. थंडीत कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका वाढतो. वाईट कोलेस्टेरॉलचा थेट संबंध उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, किडनीचे आजार व मधुमेहाशी आहे. हे सर्व हृदयासाठी हानिकारक आहेत. हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होतात, तर तळलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढते, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू लागते. २०२१ मधील आय इंडिया फिटच्या अहवालानुसार, ५०.४२% भारतीय कोलेस्टेरॉलसंदर्भात ‘उच्च धोका’ किंवा ‘बॉर्डरलाइन’वर आहेत. २०१९ मधील व्यापक राष्ट्रीय पोषण सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, ५ ते १९ वर्षे वयोगटातील ३ ते ४% मुले आणि किशोरवयीनांमध्येही एकूण कोलेस्टेरॉल वाढले आहे. कोरियन नॅशनल हेल्थ इन्शुरन्स सर्व्हिसला ३५ लाख रुग्णांच्या डेटा विश्लेषणात आढळून आले की, उच्च कोलेस्टेरॉल किंवा शुगर असलेल्या लोकांना हार्ट अॅटॅकचा धोका ४२% जास्त असतो.

1. दररोज १५० ग्रॅम एकदल धान्य : रोजच्या आहारात सुमारे १५० ग्रॅम एकदल धान्याचा समावेश केल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका २२ टक्क्यांनी कमी होतो. वास्तविकतः यामध्ये आढळणारे फायबर शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल काढून टाकते व चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. ओट्स, शिंगाडा, राजगिरा, गव्हाचे पीठ, साबुदाणा, नाचणी इ. प्रमुख एकदल धान्ये आहेत.

2. रोज एक सफरचंद वा पपई सफरचंदांमध्ये उच्च फायबर आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात. हे रक्त स्वच्छ करून कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. याशिवाय पपईमुळे कोलेस्टेरॉलचा धोकाही कमी होतो. पपई कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडीकरण होण्यापासून प्रतिबंधित करते. कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडायझेशन होते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो. या ब्लॉकेजमुळे हृदयाचे आजार होतात. हृदयविकाराचा धोका वाढतो.

3. योग सर्वात लाभदायक २०२० मध्ये जनरल सिस्टिमॅटिक रिव्ह्यूच्या संशोधनात आढळून आले की, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी योग सर्वात प्रभावी आहे. त्यासाठी कपालभाती, चक्रासन, शलभासन, सर्वांगासन इ. योग करता येतात. तथापि, सायकलिंग व वेगवान चालणेही कोलेस्टेरॉल घटवण्यास उपयुक्त आहे.

4.आठवड्यातून ५० मिनिटे जोमदार व्यायाम करा अमेरिकन सीडीसीच्या मते, आठवड्यातून ५० मिनिटे जोमाने व्यायाम केल्याने हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका ५०% कमी होतो. व्यायामामुळे चांगले कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदय व श्वसन प्रणाली मजबूत होते. रक्तदाब कमी करते. रक्तातील साखर सुधारून इन्सुलिनची पातळी सुधारते.

5. ४.५ किलो वजन घटवल्याने कोलेस्टेरॉल ८% घटते वेबएमडीनुसार, तुमचे वजन जास्त असल्यास सुमारे ४.५ किलो वजन कमी केल्याने वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण ८ टक्क्यांनी कमी होऊ शकते. मात्र, वजन कमी करण्याची घाई करू नये. आठवड्यातून ५०० ग्रॅमपर्यंत कमी होणे ही एक आदर्श परिस्थिती आहे.

6. लाल मांस, लोणी व प्रक्रियायुक्त अन्न कमी करा लाल मांस, लोणी आणि प्रक्रिया केलेले पदार्थ थेट कोलेस्टेरॉलशी संबंधित आहेत. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळते, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते, विशेषतः वाईट कोलेस्टेरॉल. हे वाईट कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांत जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेज आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

बातम्या आणखी आहेत...