आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट भाष्य:आता हिंदूंची मते विभागलेली राहिलेली नाहीत

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय भारतीय राजकारणात १९८९ पासून २५ वर्षे जातींचे वर्चस्व होते, पण २०१४ मध्ये हिंदू मतांची लढाई धर्माने जिंकली. नरेंद्र मोदींना या वस्तुस्थितीची सखोल जाण आहे. आपल्या वैचारिक प्रतिस्पर्ध्यांना जाळ्यात फसवण्यासाठी मुस्लिमांमधील मागासवर्गीयांत/जातींमध्ये आपले अस्तित्व वाढवण्यासाठी ते भाजपला कसे आवाहन करत आहेत याचा विचार करा. मोदींना माहीत आहे की, त्यांचे विरोधक हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी जातीचा वापर करतात, तर ते मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी तसे करू शकत नाहीत का? प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच चालीने पराभूत करण्याची ही कला आहे. नुकत्याच हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत वाऱ्याचा अंदाज घेण्यासाठी मोदींनी फुगवलेल्या फुग्यावर पहिली ‘सेक्युलर’ प्रतिक्रिया अशी असावी - ‘तुम्हाला काहीही संधी नाही! मुस्लिमांना ते पसमांदा (मागासलेले) आहेत, दबंग अश्रफ त्यांचे शोषण करत आहेत, जसे हिंदूंमधील उच्च जाती खालच्या जातीचे शोषण करतात, याची आठवण करून देऊन त्यांची मते मिळवता येतील असे मोदीजींना वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा!’ धर्मनिरपेक्षतावाद्यांची ही विचारसरणी थोड्या काळासाठी योग्य असू शकते, परंतु जातीयवाद आणि त्याच्या आधारे होणारे सामाजिक भेदभाव यामुळे पीडितांमध्ये तीव्र प्रतिक्रिया निर्माण होतात. कधी तरी या आवाहनाला अनुकूल प्रतिसादही मिळू शकतो. भाजप दीर्घ खेळ खेळत आला आहे. नुकत्याच झालेल्या कोणत्याही निवडणुकीत त्यांनी मुस्लिम उमेदवाराला - किमान तगड्या उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. पण, मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी किती मुस्लिम उमेदवार उभे केले ते पाहा. तेथे भाजपचे ९२ मुस्लिम उमेदवार विजयी झाले आहेत. अनेक वाॅर्डांत मोठ्या प्रमाणात त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. तुम्ही मोदी-शहांच्या भाजपचे विरोधक असाल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुमचेच नुकसान करू शकता. हिंदू मतांवरील त्यांच्या पकडीला आव्हान मिळाले नाही तर लोकसभेसह महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम उमेदवारांना तिकीट देणे भाजपसाठी चांगली कल्पना ठरू शकते. मग त्याच्या दोन्ही हातांत लाडू असतील. एक म्हणजे, ते मुस्लिम-मुक्त असल्याचा आरोप खोडून काढण्यास सक्षम असेल, जे आजचे प्रतीकात्मक आणि संख्यात्मक दोन्ही दृष्टीने खरे आहे. दुसरे म्हणजे, मुस्लिम मतांचा थोडासा भागही त्याच्याकडे वळला तर तो विरोधी पक्षाला इतरत्र गाडून टाकेल. मोदींच्या विरोधकांनी मुस्लिम मतदारांची अडवणूक केल्यास मोदींचा हिंदू आधार अधिक मजबूत होईल. असे म्हटले जाईल की बघा, हे लोक धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतात, परंतु त्यांना फक्त मुस्लिम मतपेढीची चिंता आहे. आणि त्यांनी त्याची दखल घेतली नाही तर मुस्लिम मतेही गमावण्याचा धोका आहे. हेच तर टाकलेले जाळे आहे. शिवाय, काँग्रेस व अनेक राज्यांत पसरलेले पक्ष त्यापासून दूर राहिल्यास असदुद्दीन ओवेसी, बद्रुद्दीन अजमल - इतर राज्यांत उदयास येणारे नवे मुस्लिम पक्ष - त्यापासून परावृत्त होणार नाहीत. याचे कारण त्यांना फक्त मुस्लिम मतांची अपेक्षा आहे. आणि या मतांचे मूळ दावेदार, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, राजद किंवा तृणमूल यांच्याकडून त्यांना खेचण्याची ही संधी होऊ शकते. मुस्लिम मते विखुरल्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. एक वेळ अशीही येऊ शकते की केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीगला चिंता वाटू शकते की, हैदराबादमध्ये उदयास आलेला नवा प्रतिस्पर्धी इथे येईल की काय, तर ती स्वतः यूडीएफ युतीच्या शिस्तीला बांधील आहे आणि आपल्याला मुस्लिम समर्थक म्हणून पाहिले जात असल्याची भीती काँग्रेसकडून वाढत आहे. तिहेरी तलाक आणि हिजाबच्या मुद्द्यांवर त्यांची प्रतिक्रिया विचारात घ्या. बहुपत्नीत्व, घटस्फोटितांना भरपाई, अल्पसंख्याक संस्थांना विशेष दर्जा, मदरशांमध्ये शिक्षण इत्यादी मुस्लिम मुद्द्यांवर मोदी सरकार पावले उचलेल तेव्हाही त्याची पुनरावृत्ती तुम्हाला दिसेल. शबरीमला प्रकरणात काँग्रेसचा वैचारिक गोंधळ दिसून आला. जिथे भाजपला तोंड द्यावे लागत नाही असे केरळ एक राज्य आहे, त्यामुळे त्यांना संधी आहे. धर्मनिरपेक्ष झेंडा उंच करून हिंदूंना दुखावण्याचा धोका पत्करावा की जुन्या परंपरेला पाठिंबा द्यावा, हा त्यांचा संभ्रम आहे. त्यांनी सर्वात वाईट पर्याय निवडला - काहीही बोलू नये, काहीही करू नये. या मुद्द्यावर राहुल गांधी स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलले तेव्हा सर्व काँग्रेसी इकडे-तिकडे पाहू लागले आणि हे पक्षाचे नव्हे, तर त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगू लागले. राजकीय वातावरणातील बदलामुळे पाण्याची पातळी वाढल्याने झपाट्याने आकुंचित होत असलेल्या बेटावर मोदींनी आपल्या वैचारिक विरोधकांना ढकलले आहे. त्यांच्यासोबत भारतातील मुस्लिमांनाही तिथे ओढले गेले आहे. २०१४ नंतरच्या भारतात भाजपला हिंदू लोकसंख्येच्या मोठा हिश्श्याने भाजपला मतदान थांबवल्याशिवाय भाजपला कोणीही हरवू शकत नाही. आदिवासी, दलित, यादव किंवा ओबीसी म्हणून मतदानाचा काळ संपला आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...