आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Hold Each Other's Hands... The Walk Will Be Easier | Article By Team Madhurima

मधुरिमा विशेष:एकमेकांचा हात धरून ठेवा... चालणे सोपे होईल

टीम मधुरिमा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज गातील अनेक देशांमध्ये ‘सपोर्ट ग्रुप्स’ म्हणजेच आधार गट प्रचलित आहेत. कधी कधी ते एखाद्या संस्थेशी संबंधित तज्ज्ञ किंवा कर्मचाऱ्यांकडून तयार केले जातात. काही वेळा काही समस्याग्रस्त व्यक्तीदेखील त्याचा पाया घालतात. जे अडचणीत आहेत, त्रासात आहेत त्यांना आधार देणे हा यामागचा उद्देश असतो. सामान्यतः यात समान समस्यांशी झुंजणारे लोक येतात आणि स्वतःसाठी उपायांचा मार्ग शोधतात. एकमेकांना भावनिक आधार, सल्ला आणि माहिती देण्यासाठी ते नियमितपणे भेटतात. एकत्र भेटूनही कोणताही मार्ग सापडत नसेल, तर गटातील लोक परस्पर संमतीने तज्ज्ञांना आमंत्रित करतात, जो मार्ग शोधण्यास मदत करतो. कशी मिळू शकते मदत? जेव्हा एखादी व्यक्ती त्रासिक वातावरणात, वैयक्तिक जीवनात किंवा कामाच्या तणावपूर्ण टप्प्यातून जात असते, तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्र आणि ओळखीचे लोक त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवतात, काहीतरी चांगले सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु योग्य मार्ग दाखवत नाहीत. जेव्हा तो तज्ज्ञांकडे जाण्याचा विचार करतो तेव्हा कोणाला भेटायचे, कोण मदत करण्यास सक्षम असेल, हे ठरवणे कठीण असते. म्हणूनच सपोर्ट ग्रुप्स अस्तित्वात आले आहेत, जेथे समान परिस्थितींना सामोरे जाणारे लोक वेळोवेळी भेटतात, मग ते आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त लोक असतील किंवा सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक अशा कुठल्याही कारणांनी अडचणींचा सामना करणारे असतील. समस्या कुठल्याही प्रकारातली असो, अशा परिस्थितीतून गेलेली किंवा जात असलेली व्यक्ती एकमेकांना मदत करण्याच्या हेतूने अशा गटांची निर्मिती होते. असे गट ही अशी ठिकाणे आहेत, ज्यांच्याकडे पूर्णपणे व्यावहारिक माहिती असल्याचे मानले जाते म्हणूनच ते सर्वात उपयुक्त आहेत. शेअर केलेल्या अनुभवांमुळे आव्हाने हलकी होतात.

ओळख गोपनीय ठेवून सांगू शकता समस्या महिलांना मदत करण्यासाठी अनेक सपोर्ट ग्रुप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अॅप्सच्या स्वरूपात ऑनलाइन काम करत आहेत. तुमची ओळख गोपनीय ठेवून तुम्हीही या गटांमध्ये सामील होऊ शकता. येथे आपल्याला स्वत:च्या समस्येनुसार तज्ज्ञ सहायक निवडण्याची संधी मिळते. ते तुमचे ऐकतात आणि तुमच्या विनंतीवर योग्य सल्लाही देतात. एकत्रितपणे तुम्ही तुमचा मुद्दा इथे मांडू शकता, तुमच्यासारख्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि अनुभवही तुम्हाला येथे समजतील. येथे कोणीही तुम्हाला गृहीत धरत नाही. तथापि, सोशल मीडियावर अशा समर्थन गटांशी कनेक्ट करताना, वैयक्तिक स्तरावर विश्वासार्हता निश्चित करून घ्या. या गटांबद्दल काही प्रश्न आहेत. जेथे असे असंख्य गट आहेत, त्या अमेरिकेतही ते उद‌्भवतात. या गटाकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असेल का? येथे कोणतीही जादूची कांडी नाही, आपल्यासारखेच लोक आहेत, ज्यांनी अडचणींचा सामना केला आहे आणि त्यावर मात केली आहे किंवा त्याच्याशी संघर्ष करत आहेत. आपल्याला माहीत आहे की, प्रत्येक समस्येवर कोणतेही एकच औषध नसते. संघर्ष हा एका प्रक्रियेअंतर्गत होत असतो.

मला माझी गोष्ट सांगावी लागेल का? तुम्हाला बोलायचे असेल तर बोला, अन्यथा सुरुवातीच्या बैठकीत शांत बसून सभेला उपस्थित राहू शकता. इतर सहभागी माझ्यावर टीका करू शकतात? चांगल्या गटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सदस्य इतरांबद्दल समान भावना ठेवतात. सपोर्ट ग्रुपमध्ये गेल्याने अधिक नैराश्य येईल का? तुमची समस्या कुठेही लोकांसोबत शेअर करताना थोडीशी लाज वाटणे किंवा चिंता वाटणे हे अगदी सामान्य आहे, परंतु सर्वांचे ऐकल्यानंतर तुम्हाला लवकरच आपली समस्या सामान्य वाटेल आणि बोलता येईल. हे गट कसे तयार होतात? अशा प्रकारचे सपोर्ट ग्रुप्स भारतात फारसे प्रचलित नाहीत. त्यामुळे तुम्हाला स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. तुम्ही एखाद्या समस्येचा सामना करत असाल किंवा त्यावर मात केली असेल तर तुम्ही तुमच्यासारख्या इतर महिला आणि तज्ज्ञांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आधार देऊ शकता किंवा इतरांना मार्ग दाखवू शकता. प्रत्येक सदस्यामध्ये चार गुण असले पाहिजेत { संयमाने ऐकण्याची क्षमता - जेव्हा एखादी नवीन व्यक्ती बोलत असते तेव्हा व्यत्यय न आणता लक्षपूर्वक ऐकणे महत्त्वाचे आहे. कधी कधी पीडितेला पूर्ण प्रामाणिकपणे ऐकून घेतले तरी तिला आराम मिळतो.

{ कोणताही निर्णय देण्याची गरज नाही - तुम्ही एखाद्याच्या संघर्ष किंवा अडचणींबद्दल ऐकत असाल तेव्हा त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याची अडचण फार मोठी नसली तरी त्याच्यासाठी ती मोठीच आहे. िनर्णयाची घाई करू नका. { गुपिते ठेवण्याची सवय - ही सर्वात महत्त्वाची गुणवत्ता आहे. एखादी व्यक्ती आपल्या अडचणी तेव्हाच उघडपणे सांगेल, जेव्हा तिला आपले अनुभव गुप्त राहतील असा आत्मविश्वास असेल. { सहानुभूतीची भावना - जी व्यक्ती स्वत:साठी उपाय शोधत आली आहे, तो टोमणे किंवा निंदा-टीका झाल्यावर अधिक अस्वस्थ होईल. प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असते. त्याच्याबद्दल सहानुभूतीची भावना असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...