आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीच्या शुभेच्छा देऊ की सांत्वन करू, मला कळत नाही. वर्षभरापूर्वी आपण काळतोंड्या कोरोनाशी लढण्यासाठी लॉकडाऊनमध्ये घरातील ताटे वाजवून त्यांचे पातेले केले होते. बिचारे गरीब एक-एक हजार किमी चालत घरी परतले आणि हा निलाजरा कोरोना पुन्हा आला आहे. कदाचित त्याने तुलसीदासांचा हा दोहा वाचला नसावा ः ‘आवत ही हरषै नहीं नैनन नहीं सनेह, तुलसी तहां न जाइए कंचन बरसे मेह...’ म्हणून सावध राहा, कारण कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. या कोरोनाने सर्वांना धारेवर धरले आहे. शतकाच्या महानायकालाही कोरोनाने पकडले आणि आता ते ‘दो गज दूरी, मास्क है ज़रूरी’ असे देशाला प्रत्येक फोन नंबरवर सांगत आहेत.
तथापि, कोरोनाने जगाला कुठल्या कुठे पोहोचवले. रामगडच्या गब्बरची पूर्ण पलटण मोदींच्या वाराणसीत क्वाॅरंटाइन झाली होती. तिथे घाटावर बसून गब्बर विचारत होता, ‘होळी केव्हा आहे?’ सांभा चहाला दूध आणण्यासाठी गेला होता. शेजारी बसलेला एक बनारसी पंचमेल पान खात होता. तो तिथूनच निशाणा साधून गब्बरच्या तोंडावर पानाची पिचकारी मारत म्हणाला, ‘होळी केव्हाही असली तरी ती साजरी करणार कशी?’ खरं आहे. गब्बरच्या टोळीत ५० डाकू आहेत व रंग खेळण्यास पाच माणसांनाही परवानगी मिळणार नाही. तरीही कुणी रंग खेळलेच तर पोलिसही त्यांच्याशी खेळतील ‘लठमार होळी!’
चित्रपटांतील धुळवडी सर्वात प्रसिद्ध आहेत. समजा सर्व मास्क लावून धुळवड खेळत असतील आणि कुणी तरी शिल्पा शेट्टी समजून रंग लावला व तो सुनील शेट्टी निघाला तर... मग सुनील शेट्टी त्याचे तोंड सुजवून त्याचा फुगा करील. आणखी एका दृश्याची कल्पना करा की, कुणी अजय देवगणकडे रंग खेळण्यासाठी गेल्यास काय होईल? ते गुलालाची नव्हे, तर गुटख्याची दोन पुड्या देऊन म्हणतील, ‘बोलो जुबां केसरी’ आणि त्यांच्या या ‘जुबां केसरी’ला शाहरुख खानचीही साथ मिळाली आहे. ‘रंग दे तू मोहे गेरुआ...’ गाऊन त्यांचे पोट भरले नाही, परंतु आता गुटखा खाऊन ‘जुबां केसरी’ म्हणून कदाचित मन भरेल. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी.
मोठ्या गोष्टींवरून आठवले की, छोट्या छोट्या गोष्टीही असतात. धुळवडीसाठी तयार केलेली भांग, मद्य कुठे आहे? छोट्या गोष्टीही कुणी व्हाॅट्सअॅप वा फोनवर करत नाहीत. सर्व घाबरलेले आहेत की, त्याचे व्हाॅट्सअॅप चॅट लीक झाले वा काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल झाले तर ते ईडीवाले होळीत लंका दहन करतील. लक्षात ठेवा, तुमच्या नशिबात ‘सारा’ उजेड नाही आणि तुमच्यावर कुणाची ‘श्रद्धा’ही नाही. ते मोठे लोक आहेत, परंतु आपण नाही आहोत. आपण मोठमोठ्या गोष्टी करायच्या नाहीत. कोरोनापासून सुरक्षित राहा. धुळवडीला गर्दी करू नका, घरात बसा. छान स्वयंपाक-जेवण करा आणि ‘गो कोरोना गो’ हा मंत्र म्हणा. कोरोनाची तुमच्याकडे येण्याची इच्छा नसल्यास सर्वकाही ठीक होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.