आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • How Can Society Be Better If People Are Not In A Better Mood? | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:लोकांची मनःस्थिती चांगली नसेल तर समाज चांगला कसा होईल?

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या समाजाची पॅथॉलॉजी (सर्व पैलू) समजून घ्यायची असेल तर तेथील गुन्ह्यांचे स्वरूप समजून घ्या, असे म्हणतात. रेल्वेमध्ये ग्रुप-डी भरतीसाठी परीक्षेला बसलेल्या उमेदवाराने तव्यावर अंगठा ठेवल्यानंतर आलेल्या फोडाची त्वचा काढून ती एका हुशार विद्यार्थ्याच्या अंगठ्यावर चिकटवली, जेणेकरून तो बायो-मेट्रिक ओळखीत अडकू नये आणि याच्याऐवजी त्याने परीक्षा देऊन त्याला उत्तीर्ण करावे. संशयावरून दक्ष पर्यवेक्षकाने अंगठ्याला सॅनिटायझर लावल्यानंतर हे रहस्य उघड झाले. या (कु) कृत्याची मानसिकता पाहा.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात क्रांतिकारक आपली सहनशक्ती पाहण्यासाठी असे प्रयोग करत असत, पण त्यामागे एक पवित्र हेतू होता. परंतु, नोकरीसाठी असे करणे हे असा माणूस स्वत:च्या फायद्यासाठी कोणताही गुन्हा करू शकतो, याचे लक्षण आहे. अशा लोकांना मानसिक उपचारांचीही गरज असते, कारण केवळ तुरुंगवासाने मनोविकार दूर होऊ शकत नाही. दुसरी घटना पाहा. ओडिशामध्ये १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह करणाऱ्या एका व्यक्तीने पैशाच्या लोभापायी पत्नीला फसवून तिची किडनी विकली. त्यांना दोन मुले आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून हा पैशासाठी पत्नीच्या माहेरावर दबाव टाकत होता. वरील दोन्ही घटनांचे स्वरूप समजून घ्या. अनेक राज्यांत वेश्या व्यवसायाच्या बाजारात बाल किंवा किशोरवयीन मुलीची विक्री होण्याचे कारण गरिबी असू शकते, परंतु या घटना मानसिक विकृती दर्शवतात. असे असताना चांगला समाज कसा निर्माण होईल?

बातम्या आणखी आहेत...