आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:नवीन ट्विटर आणखी चांगले कसे करता येईल?

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर हे सोशल मीडियाचे असे व्यासपीठ आहे, ज्यावर संपूर्ण जग आपले मत व्यक्त करते. हा सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असू शकत नाही, परंतु सामान्य धारणा तयार करण्यासाठी आणि चॅनलाइज करण्यासाठी हे निश्चितपणे सर्वात प्रभावी साधनांपैकी एक आहे. राजकारण, व्यवसाय, मीडिया आणि इतर उद्योग व संस्थांमधील सर्व जागतिक नेते ट्विटरवर आहेत. जगातील नवीनतम विचार, मते, वादविवाद, दृष्टिकोन हे सर्व ट्विटरवर व्यक्त केले जाते. तेथे कोणीही कोणावरही भाष्य करू शकतो, कोणालाही टॅग करू शकतो आणि कोणतेही ट्विट शेअर किंवा रिट्विट करू शकतो. तेथे सर्वच कौतुक, समर्थन, टीका, उपहास, द्वेष आणि अपशब्दांसाठी समान पात्र आहेत. कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता, यामुळे ती व्यक्ती तुम्हाला दिसणे बंद होईल. पण, तुम्ही त्याचे ट्विट हटवू शकत नाही किंवा त्याला ट्विट करण्यापासून थांबवू शकत नाही. दीर्घकाळापासून ट्विटरवर असलेल्या कोणालाही विचारा, ते तुम्हाला हा प्लॅटफॉर्म किती विषारी आहे, हे सांगतील. परिस्थिती अशी आहे की, मला निळा रंग आवडतो, असे ट्विट केले तर कोणी म्हणेल, लाल रंगाबद्दल तुम्हाला काय अडचण आहे?

ट्विटरवर मनमानीला इतकीही मोकळीक नाही, हे ठीक आहे. तपासणी केली जाते, वापरकर्त्यांना निलंबित केले जाऊ शकते, समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल खाती ब्लाॅकही केली जातात. येथे सर्वात उल्लेखनीय उदाहरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे खाते ट्विटरने काढून टाकले होते. या कारवायाही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. ते आपली मर्जी चालवतात किंवा त्यांचा डाव्यांकडे कल असल्याचे आरोप ट्विटरवर होत आहेत. यामुळेच ज्या ट्विटरवर जगभरातील तू-तू-मैं-मैं होते, तेच ट्विटर वादग्रस्त ठरले होते. त्याचा नफा अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने ती आता गुंतवणूकदारांची आवडती कंपनी राहिली नाही. आणि मग, एक दिवस सर्वकाही बदलले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलाॅन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले. हे सहा महिन्यांच्या नाट्यानंतर घडले, त्यामध्ये अनेक प्रयत्न, कायदेशीर कार्यवाही आणि ट्विटरवरच शब्दांची लढाई झाली. टेस्ला, स्पेसएक्स आणि इतर अनेक कंपन्यांचे सीईओ इलाॅन मस्क हे लार्जर दॅन लाइफ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना मंगळावर वसाहत करून मानवता बदलायची आहे. विचारांच्या देवाणघेवाणीसाठी आवश्यक असलेला डिजिटल चौक म्हणून ते ट्विटरचा विचार करतात. पण, ट्विटरचा तो उद्देश नसला तरी आज ते जगातील सर्वात ध्रुवीकरण झालेले व्यासपीठ झाले आहे. दररोज येथे जोरदार वादविवाद होतात आणि तोंडी जमाखर्च केले जातात. अपशब्दांचा भडिमार, अपमान, वैयक्तिक हल्ले आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांबद्दल कडवट वैमनस्य यांचे हे वैशिष्ट्य बनले आहे. आज ट्विटर मानवतेचे सर्वात वाईट रूप उघड करत आहे आणि लोकांना आपापसात विभागत आहे.

मस्कव्यतिरिक्त एखाद्या अब्जाधीशाने ट्विटर विकत घेतले असते तर लोकांना काळजी वाटली असती की, विचारांच्या अभिव्यक्तीचे सर्वात मोठे सार्वजनिक व्यासपीठ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या हातात गेले आहे. पण, तो मस्क असल्यामुळे आणि आपण त्यांना जितके ओळखतो त्यानुसार आपण खात्री बाळगू शकतो की, त्यांना पापाचे राज्य चालू ठेवण्यात रस नसेल. त्यांना ट्विटर दुरुस्त आणि अधिक सकारात्मक, न्याय्य व नफा देणारे करायचे आहे. नवीन ट्विटर काय करू शकते याबद्दल मी काही टिप्स देणार आहे. प्रथम, ट्विटर हे मुक्त भाषणाचे व्यासपीठ आहे आणि असावे. पण, वास्तविक जीवनाप्रमाणे ट्विटरवर भाषण स्वातंत्र्य देता येत नाही. यात द्वेषयुक्त भाषण, दिशाभूल करणारी माहिती, भावना भडकवणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी स्वतंत्रपणे शोधणे थोडे कठीण आहे, परंतु जे काही निकष स्वीकारले जातात, ते अल्गोरिदमद्वारे उघड व सार्वजनिक केले पाहिजेत आणि राजकीय कल नसलेल्या पॅनेलने निर्णय घेतला पाहिजे.

दुसरे, रुक्ष वर्तन बेकायदेशीर नसले तरी ते अनेक लोकांसाठी अप्रिय असू शकते. यामुळे अनेक चांगले, बुद्धिमान, सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण लोक ट्विटरपासून दूर राहू शकतात. एखाद्या व्यक्तीला ट्रोल्सच्या टोळीद्वारे शिवीगाळ करणे, थट्टा करणे, धमकावणे किंवा त्रास देणे हा एक चांगला अनुभव असू शकत नाही. अल्गोरिदम वापरून ट्विटरवर असभ्य वर्तन वेगळे करणेदेखील अवघड आहे, तरीही ट्विटरने अपमानास्पद वापरकर्त्यांना चिन्हांकित करण्याची व्यवस्था करावी. उदाहरणार्थ, वापरकर्त्याला एकापेक्षा अधिक खात्यांमधून ब्लाॅक केले गेले असेल किंवा अनेक वेळा रिपोर्ट केले गेले असेल तर ते समस्याग्रस्त खाते म्हणून हायलाइट केले जाऊ शकते. चांगल्या चर्चेसाठी आचारसंहिता असणेही आवश्यक आहे.

तिसरे, ट्विटर ही खासगी कंपनी असू शकते, परंतु इलाॅन मस्क आणि त्यांच्या गुंतवणूकदारांच्या गटाने त्यात भरपूर पैसे (४४ अब्ज डाॅलर) गुंतवले आहेत. त्याची वसुली करून त्यावर नफा मिळवणे आवश्यक आहे. यासाठी ट्विटरला नवीन फीचर्सची आवश्यकता असेल. ट्विटर शॉपिंग, सबस्क्रिप्शन आधारित विशेषाधिकार, दीर्घ कंटेंटचे सशुल्क प्रकाशन इत्यादी चांगले पर्याय सिद्ध होऊ शकतात. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...