आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • How Did Congress Get A Big Victory In Karnataka? Chetan Bagat | Rahul Gandhi

विश्लेषण:कर्नाटकात काँग्रेसला कसा मिळाला मोठा विजय?

लेखक चेतन भगत13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक निकालाने काँग्रेसला नवी ऊर्जा व गती दिली का? नक्कीच. पण, यावरून आगामी निवडणुकीत काय होणार हे सांगता येत नाही!

मेहनतीबरोबर नशिबाची साथही

भारतीय राजकारण हा एक रोमांचक खेळ आहे. येथे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळ कधीच संपत नाही आणि अपेक्षेपेक्षा जास्त निकाल येत राहतात. विजेता हा अखेर विजेता असतो आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळालेही पाहिजे. तथापि, जीवनाप्रमाणे निवडणुकीतही मेहनत करत असताना कधी कधी नशीबही तुम्हाला साथ देऊन जाते!

कर्नाटक विधानसभेचे निकाल येऊन अवघे काही दिवस झाले आहेत. तथापि, याबद्दल यापूर्वी डझनभर लेख लिहिले गेले आणि कर्नाटकात भाजप का हरला व काँग्रेसला मोठा विजय का मिळाला यावर टीव्हीवर चर्चा झाल्या आहेत. काँग्रेसचे आकडे चांगले आहेत. २२४ पैकी १३५, तर भाजपने ६६ जागा जिंकल्या. एवढा मोठा विजय काँग्रेसने गेल्या काही दशकांत पाहिलेला नाही. काँग्रेससाठी ही पर्वणीच आहे.

काँग्रेसच्या विजयाची अनेक कारणे जाणकार सांगत आहेत. ते म्हणजे

: १) राज्यातील मागील भाजप सरकारची भ्रष्ट प्रतिमा, ती काँग्रेसने ठळकपणे मांडली, २) काँग्रेसचे मजबूत, एकसंध स्थानिक नेतृत्व विरुद्ध भाजपचे तुकडे झालेले स्थानिक नेतृत्व ३) भाजपने राष्ट्रीय निवडणुकीप्रमाणे ही स्थानिक निवडणूक लढवली, त्यात पंतप्रधानांना मुख्य चेहरा केले ४) कर्नाटकात चालत नसलेल्या जातीय मुद्द्यांवर भाजपचे लक्ष होते ५) काही जातीय समीकरणे भाजपच्या विरोधात गेली. काहींचे म्हणणे आहे की, यावरून बदलाचे वारे,

काँग्रेसचा उदय आणि २०२४ मध्ये भाजपसमोरील आव्हाने दिसतात. पण, जरा थांबा! आधी कर्नाटक समजून घेऊ. भाजपच्या पराभवाची सर्व कारणे प्रथमदर्शनी बरोबर आहेत. तथापि, प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्यांचा खोलवर विचार केला तर आपल्याला दिसेल की, वरील कारणे अतिशयोक्तीची आहेत. कर्नाटक निवडणुकीची पहिली बाजू म्हणजे ती तिरंगी आहे. भाजप, काँग्रेस आणि जेडी(एस) असे तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या आघाड्यांनी लढत आहेत. त्रिकोणी लढतीत मतांच्या वाट्यात थोडासा फरकही निकालात मोठा फरक करू शकतो. २०१८ आणि २०२३ मधील व्होट शेअरमधील बदल पाहा. भाजपच्या मतांचा वाटा ३६%, काँग्रेसचा ३८% वरून ४३% आणि जेडीएस १८% वरून १३% झाला. पण, जिंकलेल्या जागांच्या संख्येत मोठी तफावत होती. भाजप १०६ वरून ६६ वर घसरला (४६ ची घसरण), काँग्रेस ८० वरून १३५ वर (५५ ची वाढ) आणि जेडीएस ३७ वरून १९ वर (१८ ची घसरण). निवडणुकीच्या निकालांवरील चर्चा शेवटी जिंकलेल्या जागांच्या संख्येवर लक्ष केंद्रित करतात आणि कदाचित ते योग्यच आहे. शेवटी जागा महत्त्वाच्या असतात. विजेते ठरवण्याचा आणि सरकार स्थापन करण्याचा हा मार्ग आहे. मात्र, कर्नाटकात काय झाले, हे समजून घेण्यासाठी मतांच्या टक्केवारीत खोलवर जावे लागेल. भाजपचा व्होट शेअर (३६%) २०१८ प्रमाणेच राहिला. हे लोकप्रियता, भ्रष्ट प्रतिमा आणि सत्ताविरोधी नुकसान दर्शवते का? याचा अर्थ कर्नाटकात पक्षाची विचारसरणी नाकारली गेली आहे का? गेल्या वेळी याच मताधिक्याने भाजपला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्याचे विजेते म्हणून स्वागत करण्यात आले. तितक्याच मताधिक्याने या वेळेस जागांची संख्या घटली आणि ‘कर्नाटकात भाजप नाकारला गेला’ या सिद्धांताला अंकुर फुटला! नेमकं काय झालं, असा प्रश्न पडतो. मतांची टक्केवारी अबाधित असेल तर इतक्या जागा का गमावाव्या लागल्या? निवडणुकीवर परिणाम करणारा एकमेव सर्वात मोठा घटक हे उत्तर आहे. जेडीएसची ही सततची पडझड आहे. जेडीएसचा व्होट शेअर १८% वरून १३% पर्यंत घसरला, म्हणजे ५% घसरला. दुसरीकडे काँग्रेसचा व्होट शेअर ३८% वरून ४३% पर्यंत वाढला आहे, म्हणजे केवळ ५% वाढ! जेडीएसचा वाटा का घटला? हा एक वैध प्रश्न आहे, त्याचे स्वतंत्रपणे विश्लेषण करणे आवश्यक आहे. मात्र, राष्ट्रीय शैलीत निवडणूक लढवणे, स्थानिक नेतृत्वातील कमकुवत समन्वय किंवा निवडणुकीच्या विश्लेषणाच्या नावाखाली ज्या याद्या तयार केल्या जात आहेत, याचा फारसा संबंध नाही. जेडीएसच्या घसरणीचा ट्रेंड आहे. राज्यव्यापी प्रादेशिक पक्षाला पर्याय म्हणून लोक पक्षाकडे पाहत नाहीत. तो संधिसाधू मानला जातो (त्याने काँग्रेस व भाजप या दोन्हींसोबत सरकारे स्थापन केली आणि सर्वात मोठ्या पक्षाचा दर्जा नसतानाही त्याचे नेते मुख्यमंत्री झाले). यामध्ये एकाच कुटुंबाचा प्रभाव जास्त आहे. याला फक्त वोक्कलिगा या एकाच जातीचा अधिक पाठिंबा मिळाला आहे. जेडीएसमधील या समस्यांमुळे अंशतः काँग्रेसच्या बाजूने मते गेली असतील. या वेळी भाजपला दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांची मतेही जेडीएसकडून काँग्रेसकडे वळल्याची शक्यता आहे. त्या अर्थाने साहजिकच बजरंग दलासारख्या मुद्द्यांवर भाजपचे लक्ष केंद्रित झाल्याने मुस्लिम मते काँग्रेसच्या बाजूने वळली असावीत. त्यामुळे भाजपचे नवीन चाहते वाढू शकले नाहीत, म्हणजेच त्यांचा व्होट शेअर वाढला नाही. दुसरीकडे वोक्कलिगा आणि मुस्लिम मते काँग्रेसच्या बाजूने गेल्याने व्होट शेअरमधील थोडासा बदलही या त्रिकोणी निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्यासाठी पुरेसा होता. याचा अर्थ या निकालांचा भाजप व काँग्रेस आणि त्यांच्या स्थानिक/राष्ट्रीय नेत्यांशी काहीही संबंध नाही? असे नाही, प्रत्येकाची स्वतःची भूमिका असते. मतांची टक्केवारी राखणेही सोपे नाही. भाजप सत्तेत असूनही या वेळी युतीविरहित विजयासाठी ठोस पावले उचलू शकला नाही, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. दुसरीकडे काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवू शकणारा खरा पर्याय म्हणून स्वत:ला सादर केले. कदाचित त्यामुळे जेडीएसची मतेही काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
चेतन भगत
इंग्रजीतील कादंबरीकार
chetan.bhagat@gmail.com