आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी मी वैयक्तिक कामानिमित्त इंदूरला होतो. दुपारी इंदूरला पोहोचताच एक गृहस्थ हात मिळवत म्हणाले, ‘यंदा मी तुमच्या जीवनावरून नवीन वर्षाचा संकल्प केला आहे.’ माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून ते म्हणाले, ‘डॉ. सुधीर परवाणी यांनी मला सांगितले की, त्यांच्याकडे आजवर अनेक भाडेकरू होते, पण तुमच्याइतके जवळचे कोणी झाले नाही.’ दशकभरापूर्वी मी इंदूरच्या एका प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञाकडे एका प्रकल्पाच्या संदर्भात जवळजवळ चार महिने भाड्याने राहत होतो. त्यांच्या घरी जाऊन सिंधी जेवणाचा आस्वाद घेण्यासह कामावरून रात्री उशिरा परतल्यावर त्यांना डिस्टर्ब करणारा मीच असलो तरी इतक्या वर्षांनंतर त्यांच्याकडून कौतुक झाल्याने मी चकित झालो. त्यांच्या बोलण्यावर हसत मी फक्त म्हणालो, ‘तुम्ही आता मला तुमच्या घरात भाडेकरू बनण्यासाठी टार्गेट करत आहात का?’ हा नवीन परिचित म्हणाला, ‘मी करू शकलो असतो तर छानच होते, पण माझा संकल्प २०२३ मध्ये चांगला शेजारी होण्याचा आहे!’ यामुळे माझे कान टवकारले गेले आणि चांगल्या शेजाऱ्याचे वर्णन कसे करता येईल, असा विचार मनात आला. माझ्यासाठी हा अलीकडच्या वर्षांपेक्षा वेगळ्या प्रकारचा संकल्प आहे. त्यांनी मान्य केले की, चांगला शेजारी असण्याचा अर्थ त्यांच्यासाठी वारंवार पार्ट्या होत नाही, पण त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करायच्या होत्या, ज्यामुळे महत्त्वाची आणि आदराची भावना निर्माण होते. मी त्यांच्याशी सहमत झालो आणि जाण्यापूर्वी वचन घेतले की, ते मला दररोज करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सांगत राहतील, जेणेकरून वर्षाच्या शेवटी त्याचे पुस्तकात रूपांतर करता येईल. चांगला शेजारी कसा असावा हे समजून घेण्यासाठी मी काही सामाजिक मानसतज्ज्ञांशी बोललो. ते म्हणाले : १. शेजारी मित्र असले पाहिजेत, हे आवश्यक नाही. त्यामुळे त्यांच्याशी राजकारणावर चर्चा करू नका. २. कधी तरी त्यांच्या घरी एक मिनिट जा आणि दारातूनच म्हणा, मी तुमची आणि तुमच्या पत्नीची तंदुरुस्ती विचारण्यासाठी आलो आहे. मी तुमच्यासाठी काही करू शकत असल्यास मला कळवा. आणि बाहेर या. ३. तुम्ही त्यांना नमस्कार म्हणाल आणि त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर वाईट वाटून घेऊ नका. त्यांना संशयाचा फायदा द्या, कदाचित ते काही कारणाने नाराज असतील. लक्षात ठेवा, एक चांगला शेजारी नेहमीच असे वातावरण तयार करतो, जिथे हसणे आणि नमस्कार करणे शक्य आहे. ४. तुम्ही दूर कुठे तरी जात असाल आणि गाडीने सामान आणणार असाल तर तिथून काही तरी आणण्याची ऑफर देऊ शकता. ५. तुम्हाला माहीत असेल की त्यांची मुले बोर्डाच्या परीक्षेला बसत आहेत, तर त्यांना चॉकलेट आणा आणि तुम्हाला त्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नसला तरीही त्यांना शुभेच्छा द्या.
तुमच्याकडे असा काही अनोखा संकल्प असेल तर त्याचे मुद्दे डायरीत नियमित लिहा. ते वर्षअखेर पुस्तक लिहिण्यास सहायक ठरेल.
फंडा असा ः एक चांगला शेजारी असण्यामध्ये उदार असणे व आपले सर्वोत्तम प्रदर्शन करणे, तसेच नियमित अंतराने ते दर्शवणे आणि त्यांच्या कठीण काळात तुम्ही त्यांच्यासोबत आहात, हे त्यांना सांगणे समाविष्ट आहे.. . एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.