आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • How Do You Feel About The Sounds Around You Musical Or Painful? | Article By N Raghuraman

मॅनेजमेंट फंडा:सभोवतालचे आवाज कसे वाटतात - संगीतमय की वेदनादायक?

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल माझ्या सहलींमध्ये मी सकाळी ८च्या आधी नाष्टा आणि संध्याकाळी ७ च्या आधी रात्रीचे जेवण करतो. या वेळेत रेस्टॉरंट्स रिकामी असतात. मी नाष्टा करताना वर्तमानपत्र वाचू शकतो आणि रात्रीच्या जेवणाचा आनंद घेताना दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या यादीवर लक्ष केंद्रित करू शकतो. सकाळी ८.३० वाजता लोक नाष्ट्यासाठी येऊ लागतात तेव्हा मी तिथून निघतो, त्याचप्रमाणे रात्री ८ च्या आधी ते जेवायला येतात तेव्हा तिथून जात असतो. मी ही सवय लावली आहे. कारण एकटेच असलेले बहुतांश पाहुणे जेवणाच्या टेबलावर बसून मोबाइलवर व्हिडिओ पाहत राहतात. मला काही हरकत नाही, पण त्याचा आवाज इतका मोठा असतो की बहुतांश वेळा तो त्रासदायक ठरतो. या फॉरवर्डेड मॅसेजेसवर कोणाची ‘हा हा ही ही’ ऐकण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये जात नाही. मी चिडतो आणि त्या पाहुण्यांनी इतरांना त्रस्त करू नये, असे सांगण्याचा रेस्टॉरंट मॅनेजरला आग्रह करतो. पण, ते ऐकत नाहीत तेव्हा मी खोलीत येतो. हेच दृश्य विमान, ट्रेन किंवा बसमध्ये दिसते. इतर लोकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात रस नसल्यामुळे मी या ठिकाणांना लवकर भेट देऊन त्यांना टाळण्याचा निर्णय घेतला. प्रवासात मी एअरपॉड्स कानाला लावतो आणि जगापासून अलिप्त होऊन स्वतःच्या विचारांमध्ये हरवून जातो. हळूहळू माझ्या लक्षात आले की, कोणी माझ्या शेजारी बसून पॉपकॉर्न खाल्ले किंवा सूप वा चहा प्यायला तर मला चीड येते. असे आवाज ऐकून चिडतो, रागाचा पारा चढतो. मला आठवते की, लहानपणी जेवणाचे ताट चमच्याने वाजवायचो तेव्हा त्या आवाजाने आई-वडील चिडायचे आणि ते थांबवण्यासाठी ओरडायचे किंवा हातातून चमचा हिसकावून घ्यायचे. तेव्हा माझ्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले, मला एक विकार आहे. मी मिसोफोनियाशी लढत आहे. २००१ मध्ये याला प्रथम परिभाषित करून नाव दिले गेले, ही मज्जासंस्थेची संवेदनाक्षम स्थिती शतकानुशतके दुर्लक्षित आहे. चमचे वाजवताना आपण पालकांना चुकीचे समजायचो, अशा स्थितीत सार्वजनिक ठिकाणी मोबाइलवर मोठ्या आवाजात ऐकणाऱ्या लोकांना आपण अडवतो तेव्हा अनेक जण गैरसमज करून घेतात. २०१७ मधील न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या संशोधनात सुचवले गेले की, आवाजामुळे मेंदूच्या पुढच्या भागामध्ये फरक होऊ शकतो, त्याचा अमिगडाला नावाच्या भावनिक केंद्राशी जास्त संबंध आहे, ते आपल्याला राग किंवा निराश झाल्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो हे ठरवते. ‘फ्रंटियर्स इन न्यूरोसायन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार, मिसोफोनिया ही ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) सारखीच स्थिती आहे. या विकारात माणसाला एखाद्या विशिष्ट कामाचे किंवा सवयीचे वेड लागते. तेव्हा मला जाणवले, मला ओसीडी असल्याने माझ्यावर आवाजांचा परिणाम होतो. या समस्येसाठी डॉक्टर एक उपचार सुचवतात, तो म्हणजे तुम्ही ऐकत असलेल्या आवाजाशी नवीन संबंध जोडणे. फंडा असा की, तुम्ही आवाजाशी संबंध जोडलात तर कदाचित त्यांचा मोठा आवाज त्रास देण्याइतपत कमी होईल आणि वेदना जाणवणार नाहीत.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...