आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:शरीर किती तंदुरुस्त... वैज्ञानिक सूत्राने जाणून घ्या वास्तविक वय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जन्माच्या आधारावर वयाची गणना केली जाते, पण प्रत्येक व्यक्तीचे जैविक वय वेगळे असते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, जैविक वय प्रामुख्याने जीन्स व पर्यावरणावर अवलंबून असते. संस्थेतील जेनेटिक्सचे प्रोफेसर डेव्हिड सिंक्लेअर यांच्या मते, आपले जैविक वय तंदुरुस्ती, शरीर रचना आणि जीवनशैली या तीन घटकांवरून ते जाणून घेता येते. प्रत्येक घटकाची तीन प्रश्नांच्या आधारे चाचणी केली जाते. आपल्या सध्याच्या वयानुसार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर आपल्याला मिळणारे गुण मिळवणे आणि वजा करणे सुरू ठेवावे. सर्व उत्तरांनंतर एकूण स्कोअर काढा. हे आपले जैविक वय आहे.

शरीराला विचारा आठ प्रश्न...
रेस्टिंग पल्स किती? : स्थिर बसून नाडी तपासा. नाडी १ मिनिटात १०० पेक्षा जास्त असेल तर वर्तमान वयात एक मिळवा.

लवचिकता कशी : पाय पुढे ठेवून बसा. हात समोर पसरवा. बोटांच्या अगदी खाली एक रेषा काढा. पुढे झुका. हात जिथपर्यंत जाईल तिथे मार्करने एक रेषा काढा व दोन रेषांतील अंतर इंचात मोजा. अंतर ५ इंचांपेक्षा कमी असेल तर स्कोअरमध्ये एक मिळवा. अंतर १० इंच किंवा जास्त असल्यास एक वजा करा. ते ५-१० इंच असेल तर बदलू नका.

शारीरिक ताकद किती? : एका वेळी शक्य तितके पुश-अप करा. पुशअप १० पेक्षा कमी असल्यास स्कोअरमध्ये १ मिळवा. संख्या २० असेल तर सध्याच्या वयातून एक वजा करा. ३० वर पोहोचल्यास २ वजा करा. संख्या १०-१९ असेल तेव्हा बदल करू नका.

काय आहे बीएमआय?
बीएमआय असा जाणून घेता येतो. बीएमआय = वजन (किलोत) / उंची (मीटरमध्ये), बीएमआय १८.५ पेक्षा कमी असल्यास वयात १ मिळवा. २५-२९.९ असल्यास २ मिळवा. ३० पेक्षा जास्त असल्यास ३ मिळवा. बीएमआय १८.५ - २५ दरम्यान असेल तर १ वजा करा.

कंबर आणि नितंबांचे प्रमाण?
नितंबाचा सर्वात रुंद भाग इंचांमध्ये मोजा. नाभीच्या वरच्या दोन इंचापासून कंबर इंचांमध्ये मोजा. आता नितंबांची रुंदी कमरेच्या रुंदीने विभाजित करा. आदर्श प्रमाण पुरुषांसाठी एक आणि महिलांसाठी ०.८५ आहे. गुणोत्तर यापेक्षा जास्त असल्यास स्कोअरमध्ये १ मिळवा.

झोप किती घेता? दररोज ७ ते ९ तास झोप घेत असाल तर स्कोअर ०.५ ने कमी करा. ५-६ तास किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपत असल्यास स्कोअरमध्ये १ मिळवा. ५ तासांपेक्षा कमी झोपत असाल तर २ मिळवा.

व्यसन तर करत नाही?
मद्यपान करत नसल्यास स्कोअरमधून १ वजा करा. नॉर्मलपेक्षा जास्त पीत असल्यास स्कोअरमध्ये २ मिळवा. कधीही धूम्रपान केले नसेल तर स्कोअरमधून ३ वजा करा. धूम्रपान सोडून ५ वर्षांहून अधिक काळ झाला असेल तर २ वजा करा. धूम्रपान करत असल्यास ३ मिळवा.

पोषण आहार कसा घेता?
संतुलित आहार घेत असल्यास गुणसंख्या जशी आहे तशी ठेवा, आहार असंतुलित असल्यास १ मिळवा.

बातम्या आणखी आहेत...