आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापा णी कमी पिणे जितके हानिकारक आहे, तितकेच जास्त प्रमाणात पाणी पिणे नुकसानदायी आहे. उदाहरणार्थ, समजा एक गुलाबाचे रोप आहे. त्याला पाणी देणे खूप गरजेचे आहे. परंतु, त्याला आपण दिवस-रात्र पाणी देत राहिलो किंवा अजिबात पाणी दिलं नाही, तर काय होईल? ते नक्कीच मरून जाईल. तसेच आपल्या शरीराचेही आहे.
सर्व पाणी एकाच वेळी किंवा पूर्ण पिऊ नका. पाणी हळूहळू किंवा एक-एक घोट प्यावे. आरामात बसून प्यावे. घाईत, चालता-चालता किंवा उभे राहून पाणी पिऊ नका. ज्या लोकांना दमा, सायनससारखे कफाचे आजार आहेत किंवा लठ्ठपणा वा मधुमेह आहे, त्यांनी पाणी कमी प्यावे. सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिऊ नये. पाणी खूप थंड किंवा खूप गरम नको, ते शरीराच्या तापमानाबरोबर असले पाहिजे. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका आणि हेवी जेवण केले असेल, तर ४० मिनिटांनंतर थोडेसे पाणी प्या. हो, जेवताना मध्ये थोडेसे पाणी प्यावे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या किंवा लघवीशी संबंधित कोणतेही आजार, जसे- संसर्ग, जळजळ, किडनी स्टोन आदी आहे त्यांनी जास्त पाणी प्यावे. पाणी नेहमी ग्लासाला तोंड लावून प्यावे, जेणेकरून ते ओठ, जीभ आणि दातांमधून जाईल. यामुळे, त्याचे तापमान शरीरासाठी अनुकूल होते, ते फिल्टरदेखील होते. संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक बाटली किंवा स्ट्रॉने पाणी पितात त्यांची त्वचा आणि केस अकाली वयस्क झाल्यासारखे दिसतात. म्हणून पाणी ग्लासमधूनच प्यावे. ज्यांना अपचन किंवा भूक न लागण्याची समस्या आहे, त्यांनी पाणी कमी प्यावे. आपले शरीर एका वेळी फक्त तीन घोटच पाणी शोषू शकते, म्हणून एका वेळी फक्त तीन घोट पाणी प्यावे. घाम आला असेल किंवा उष्ण वातावरणातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये, कारण या स्थितीत पाणी प्यायल्याने अनेक प्रकारचे त्वचारोग, फुप्फुसाचे आजार आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत पाणी पिणे हृदयासाठी हानिकारक होऊ शकते. अन्य पेये पाण्याला पर्याय नाहीत, हे एक सार्वत्रिक सत्य आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणीच प्या. त्याच्या जागी कोल्ड्रिंक्स, लस्सी, ज्यूस अशी इतर पेये घेऊ नका. कधी प्यावे पाणी? रात्रीच्या वेळी एक ग्लास पाणी प्यावे. सकाळी उठल्यावरही एक ग्लास कोमट पाणी प्यावे आणि रात्रीच्या वेळी जाग आल्यावर एक ग्लास पाणी प्यावे. कारण रात्री झोपेचे एकूण आठ-दहा तास असतात, अशा स्थितीत शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये, म्हणून रात्री पाणी पीत राहावे. सकाळी उठल्यावर ब्रश न करता पाणी प्यावे, यामुळे पोटाचे अनेक आजार नष्ट होतात. उष्ण वातावरण असेल आणि खूप कष्टाचे काम केले असेल किंवा खूप घाम येत असेल, तर जास्त पाणी प्यायला हवे. आजारपणात, गर्भावस्थेत किंवा स्तनपानाच्या वेळी जास्त पाणी प्यावे. पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे तहान लागण्यापूर्वी पाणी प्यावे. कारण जेव्हा डिहायड्रेशन सुरू झालेले असते तेव्हा तहान लागते. गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वीही पाणी प्यावे. त्यामुळे अनेक संसर्गांपासून बचाव होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.