आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • How Long Will The Congress MLAs Continue To Defect? | Agralekh Of DivyaMarathi

अग्रलेख:कुठपर्यंत होत राहणार काँग्रेस आमदारांचे पक्षांतर?

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यातील काँग्रेसच्या ११ पैकी आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याची पटकथा जवळपास महाराष्ट्रासारखी आहे. जाहीरपणे पक्ष न सोडण्याची शपथ घेणाऱ्या काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आता देवाचा आदेश आला म्हणत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोणी तरी त्यांना विचारावे की, देवानेही दीनदयाळाची भूमिका सोडून राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली आहे का? मात्र, ‘ऑपरेशन लोटस’ राबवून भाजप अनैतिक पद्धतीने पक्ष फोडत असल्याचा काँग्रेसचा आरोप म्हणजे घर सांभाळता आले नाही तर शेजाऱ्याला दोष द्या, असा आहे. दोनतृतीयांश आमदार पक्ष का सोडतात? आसामच्या एका तगड्या नेत्याने दिल्लीत जाऊन राज्याची समस्या सांगितली तेव्हा नेतृत्वाने लक्ष दिले नाही, असा आरोप करत पक्ष सोडला.

मग एखादा विधिमंडळ गट पक्ष सोडतो, तेव्हा आपला मतदार हे पक्षांतर कसे स्वीकारेल, याची भीतीही असते. हे पाऊल त्याच्या भविष्यावर परिणाम करणारे असेल तर ते तसे का करतील? भाजपचे आमदार क्वचितच पक्ष बदलतात, कारण पक्षाचा जनाधार त्यांना असे करण्यापासून रोखतो, हे खरे नाही का? काँग्रेसने आपली ओळख खंबीर विचारसरणी निर्माण करून संपूर्ण समाजाला त्या विचारसरणीकडे आकर्षित करावे लागेल. केवळ एक शक्तिशाली आणि वचनबद्ध संघटन तयार केल्यानेच अशा प्रकारची पडझड रोखता येईल.

बातम्या आणखी आहेत...