आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिमकार्डचा वापर करून ऑनलाइन फसवणूक आणि सायबर ठकासारखे गुन्हे केला जातात. स्कॅमर्स यासाठी बनावट पद्धतीने सिम प्राप्त करतात. अनेकदा यूजर्सला माहितही नसते की, त्याच्या नावाने अन्य कुणी सिम कार्ड वापरत आहे. अशा स्थितीत आपल्या नावावर किती सिम कार्ड जारी झाले आहेत,हे यूजरला जाणून घेणे गरजेचे आहे. याची माहिती घेऊया...
{एका आधारवर किती सिम कार्ड मिळतात? तुम्ही एखादे सिम कार्ड घेत असाल तर त्याला आधारशी लिंक करावे लागते. म्हणजे, त्याची केवायसी आवश्यक आहे. एका आधार कार्डातून जास्तीत जास्त ९ सिम कार्ड खरेदी करता येतात. मात्र, सर्व सिम कार्ड्स कुण्या एखाद्या ऑपरेटरकडून जास्तीत जास्त ६ सिम कार्ड्स घेऊ शकता. गैरवापर टाळण्यासाठी एखाद्याला कागदपत्र देताना स्पष्ट लिहू शकता की, ही कागदपत्रे कोणत्या कामासाठी दिली आहेत.
{सिम कार्ड जारी झाले ते कसे ओळखावे? याचा शोध घेण्यासाठी यूजरचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. सिम कार्ड ट्रॅक करण्यासाठी वापरकर्त्यास सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वेबसाइटवर https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर क्लिक करावे लागले. यानंतर वेबसाइटमध्ये दिलेल्या कॉलममध्ये मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. त्यावर ओटीपी येईल. ओटीपी घातल्यावर व्हॅलिडेशन होईल. तसे केल्यावर आधार कार्डशी लिंक्ड सर्व क्रमांक समोर येतील.
{चुकीचा क्रमांक कसा डिअॅक्टिवेट करावा? उघडलेल्या िवंडोत प्रत्येक क्रमांकासमोर तीन पर्याय दिसतील- Required, Not required आणि This is not my number वर क्लिक करा. असे करताच रिपोर्ट आपोआप सरकारपर्यंत पोहोचेल. यानंतर असे क्रमांक डिअॅक्टिवेट करण्याची कारवाई सुरू होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.