आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्स:नैराश्याचा सामना करण्यासाठी स्वत:ला कसे तयार कराल?

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात नैराश्य अनेक प्रकारचे असते. काही निराशा लहान असते तर काही मोठीही असते. जसे की नोकरी जाणे वा आरोग्य बिघडणे, एखाद्या जवळच्या व्यक्तीचे जग सोडून जाणे इ. हे अजिबात सोपे नाही, मात्र अशा प्रकारचे नैराश्य आणि दु:खाचा सामना करण्यासाठी स्वत:ला प्रत्येक प्रकारे तयार करावेच लागेल. नैराश्याने तुमचा वर्तमानकाळ खराब करू नये, यासाठी काही उपाय करता येतील. त्यामुळे तुम्ही आंतरिकदृष्ट्याही मजबूत होता...

1) स्वत:ला प्रश्न विचारा, चिंतेचा उपयोग काय?
अनेकदा असे होते की, वाईट बातम्यांचा सामना करण्यासाठी जी तयारी गरजेची असते, त्यात चिंता फायदेशीर ठरू शकते. मात्र तुम्ही आधीच शक्य ते सर्व प्रयत्न केले असतील तर मात्र चिंता केल्याने फार काही फायदा होणार नाही, हे येथे समजून घ्यावे लागेल. अशावेळी चिंता करून काहीच उपयोग होणार नाही. तुमचे आरोग्य मात्र नक्की बिघडेल. त्यामुळे उपयोग नसणारी चिंता काय कामाची?

2) सर्वात वाईट काय होऊ शकते, विचार करा...
मनात भीती असेल तर शक्य असेल तोपर्यंत नैराश्याचा सामना करण्यासाठी आपली सर्व साधने एकत्र करा. त्यानंतर जो संभाव्य परिणाम तुम्हाला समोर दिसत असेल त्याबाबत विचार करा. या पद्धतीमुळे आपल्या आत सतत वावरणारी काल्पनिक वा संभाव्य भीती, नैराश्याला मोठ्या प्रमाणात थोपवण्यात मदत मिळू शकते. त्यामुळे सर्वात वाईट काय होऊ शकते, याचा एकदा विचार करून पाहाच.

3) चिंता करा, मात्र आशा कधीच सोडू नका
कोणतेही दु:ख, वेदना वा अपघाताचा सामना पूर्ण मजबुतीने नेहमीच सकारात्मक राहूनच केला जाऊ शकतो. आपल्या वर्तमान काळावर कोणताही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने आपले नैराश्य सांभाळता आले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक आणि शांत राहिल्यासच हे शक्य आहे. त्यासाठी सामाजिक सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. चिंता करा, मात्र आशा कधीच सोडू नका.

4) दु:खाची उजळणी नको, वेदना होतील
जर तुम्हाला वाटत असेल की, दु:ख होण्यापूर्वीच त्याचा (दु:खाचा) विचार करून वाईट वाटून घेण्याने फायदा होईल, तर असे अजिबात नसते. नकारात्मक भावनांसह कायम राहिल्याने आधीही त्रास होईल आणि नंतर तर प्रचंड वेदना होतील. त्यामुळे आशा कायम असू द्या, मात्र अतिआत्मविश्वास नको. नकारात्मक परिणाम नाकारणेही योग्य नाही. संतुलन बनवणे तुम्हाला शिकावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...