आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन निदान:योग्य पद्धतीने कसे वाचावे?

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

• बहुतांश लोक जेवढे वाचतात तेवढे आत्मसात करत नाहीत, असे दिसते. किंवा ते आत्मसात करू शकतात त्यापेक्षा अधिक वाचतात. • ते अनेक कथा, कादंबऱ्या आणि नाटके खूप जलद वाचू शकतात, परंतु वाक्प्रचार, म्हणी, व्याकरणातील बारकावे समजू शकत नाहीत. म्हणूनच ते बोलताना मूलभूत चुका करतात. • मला वाटते, आपण प्रत्येक चांगले पुस्तक तीन ते चार वेळा वाचले पाहिजे, जेणेकरून त्यातील मजकूर चांगल्या प्रकारे समजून घेता येईल आणि आत्मसात करता येईल. • कदाचित प्रत्येक जण प्रत्येक पुस्तक तीन ते चार वेळा वाचू शकत नाही, कारण प्रत्येक जण विद्वान असू शकत नाही. मात्र, काही पुस्तके अशी असतात की, ती पुन्हा पुन्हा वाचूनच समजतात. • मी संस्कृत कसे शिकलो ते सांगू का? महाभारतातील नल-दमयंती प्रकरण पुन्हा पुन्हा वाचून आणि अतिशय काळजीपूर्वक वाचून मी ते पूर्णपणे आत्मसात केले होते. त्याच्याशिवाय ते शक्यच नव्हते.

महर्षी अरविंद योगी व तत्त्वज्ञ (१८७२-१९५०)

बातम्या आणखी आहेत...