आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • I Am Talking About The Hindustan Of 1947... On One Hand, The Script Of Freedom Was Being Written, On The Other Hand, Religious Discussions Were Burning In The Streets. | Marathi News

स्वातंत्र्याचा मार्ग:मी 1947 चा हिंदुस्थान बोलतोय... एकीकडे स्वातंत्र्याची पटकथा लिहिली जात होती, दुसरीकडे गल्ली-बोळांत धार्मिक चर्चा पेटली होती

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल १९४७... देशातील दोन धर्मांतील लोकांत दंगली पेटल्या होत्या. त्या रक्ताचे डाग पडलेल्या कागदांवरच नवा व्हाइसराॅय स्वातंत्र्याच्या मार्गे नवा नकाशाही शोधत होता. सोबत देशाची राज्यघटनाही तयार होत होती. ते वातावरण मी हिंदुस्थान बोलतोय... या शब्दांत सांगताहेत - डॉ. धनंजय चोप्रा

^ऊन वाढत चालले होते आणि स्वातंत्र्यासाठीची भावनाही पेटली होती. "कदम-कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा। ये जिंदगी है कौम की, तू कौम पर लुटाए जा'... आझाद हिंद सेनेचे हे देशभक्तिपर गीत गल्ली-बोळांत वाजत होते. तेव्हा प्रभातफेऱ्या काढणे म्हणजे एक धोकाच होता. परंतु, सळसळत्या रक्ताची मुलांना याची पर्वा कुठे होती? इकडे अवघा देश दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय भेटीगाठींकडे डोळे लावून बसला होता. तारीख होती : १५-१६ एप्रिल, माउंटबॅटन यांनी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या असतानाच स्वातंत्र्याचा एक विचित्र प्रस्ताव सादर करून टाकला. "डिकी बर्ड प्लॅन' नामक ही योजना भारतीय नेत्यांना काही रुचली नाही. देशाचे तुकडे कराल तर अराजक माजेल, असा इशाराही देण्यात आला. अशा उथळ योजनेमुळे मार्ग निघणार नाही हे माऊउटबॅटन यांच्या लक्षात आले. वास्तविक ज्या धार्मिक वितुष्टाच्या आधारे ब्रिटिशांमार्फत भारतात राज्य चालवले जात होते त्यातून निर्माण झालेले रक्ताचे डाग ब्रिटिश राजघराण्याला आपला प्रिय युनियन जॅकवर नको होते. इकडे संविधान सभा स्वतंत्र भारताची रूपरेषा निश्चित करण्यात व्यग्र होती.

याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत हिंदू कोड बिल सादर केले होते. नेहरू यांचे समर्थन असूनही या हिंदू कोड बिलास प्रचंड विरोध झाला. यादरम्यान संविधान सभेचे तिसरे अधिवेशन २८ जुलै ते २ मे दरम्यान झाले. यात मुस्लिम लीग सहभागी झाली नाही. मात्र, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच सहा राज्यांतील प्रतिनिधी संविधान सभेचे सदस्य होण्यास राजी झाले होते. त्यांनी हे सदस्यत्वही स्वीकारले होर्ते. यादरम्यान त्रावणकोर, भोपाळ, हैदराबाद, जाेधपूर आणि जुनागड संस्थानांचे प्रमुख आणि त्या भागातील प्रजेतील मतभेद विकोपाला केले होते. भोपाळ संस्थानाचे नवाब हमीदुल्लाह खान मुस्लिम लीगच्या नेत्यांचे विश्वासू होते. असे मानले जाते की, भारतात समाविष्ट व्हायचे की नाही याचा निर्णय ते घेऊ शकत नव्हते. तेथील हिंदुबहुल जनता त्यांच्या विरोधात होती. त्रावणकोरचे दिवाण सी. पी. रामास्वामीही आता जिनांच्या जाळ्यात अडकले होते. - उद्या वाचा : ऐतिहासिक दस्तऐवजाची समाधी

बातम्या आणखी आहेत...