आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • IB Will Be Successful Only If Identity Remains Secret | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:ओळख गुप्त राहिली तरच यशस्वी होईल आयबी

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहमंत्र्यांनी आयबीच्या सर्व सहायक युनिटच्या प्रमुखांसोबतच्या सहा तासांच्या बैठकीत त्यांना धोक्यांबद्दल इशारा देण्यासच नव्हे, तर उपाय सुचवण्याचाही सल्ला दिला. इथपर्यंत ठीक होते, परंतु समस्या सोडवण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, अशीही अपेक्षा करण्यात आली. आयबीचे जाळे जिल्ह्यांपर्यंत पसरलेले आहे व त्यांना प्रत्यक्ष धोके/समस्या दिसत असल्याने त्यांच्याकडून उपाय सुचवणे अपेक्षित आहे, हे खरे, पण उपायात सक्रिय भूमिकेचा सल्ला देण्यात धोके आहेत. ओळख पूर्णपणे गुप्त राहिली तरच धोका किंवा समस्या जाणून घेण्यात आयबी यशस्वी होऊ शकते. यामुळेच आयबी व त्याच्या देशभरातील युनिट्समध्ये साइन-बोर्ड नाहीत किंवा त्यांचे कर्मचारी त्यांची ओळख उघड करत नाहीत. हे कर्मचारी उपायात सक्रिय होताच त्यांची ओळख लपून राहणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दहशतवादाने जागतिक परिमाण गाठले आहे आणि दहशतवाद्यांच्या कारवाया जाणून घेण्यासाठी त्यांच्या नेटवर्कमध्ये खोलवर प्रवेश करणे आवश्यक असताना सरकारची ही नवीन अपेक्षा भविष्यात आयबीला आपली मूळ भूमिका बजावण्यात अडथळा आणेल. आयबीकडून धोके आणि उपायांचा सल्ला मिळाल्यास उपाययोजनांसाठी केंद्रीय तपास संस्थेच्या व्यतिरिक्त सरकारकडे लष्कर आणि स्थानिक प्रशासनाचे कायदेशीर अधिकार आहेत. या सल्ल्याचा दुसरा धोका म्हणजे ती सक्रिय भूमिकेत आल्यास आयबी व एनआयए आणि राज्यातील प्रशासकीय यंत्रणा यांच्यात वाद निर्माण होऊ शकतो, कारण छापे टाकणे, अटक करणे हे आयबीच्या अधिकारात नाही. सरकारे गुप्तचर विभागाचा वापर केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना धोक्यांपासून सावध करण्यासाठीच करतात.

बातम्या आणखी आहेत...