आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:श्रद्धा अतूट असेल तर ईश्वर प्रेरणा देत राहतो

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी सकाळी नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाट ओलांडताना मी त्याला माझ्या कारच्या पुढे जाताना पाहिले. त्याच्या पाठीवर लटकवलेल्या पिशवीवरील कागदावर लिहिले होते, ‘पदयात्रा ः लखनौ ते तिरुपती मार्गे शिर्डी.’ घाट असल्याने मी गाडी थोडी पुढे थांबवली आणि तो येण्याची वाट पाहू लागलो. सैन्यात हवालदार पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अमित कुमार सिंग (४१) हे टी-७२ टँकचे ऑपरेटर होते आणि त्यांचे ११ ठिकाणी पोस्टिंग होती, गेल्या ४१ दिवसांपासून ते लखनौहून तिरुपतीला जाण्यासाठी एकटेच चालत होते. त्यांना आणखी ७० दिवस चालायचे होते. त्यांनी लखनौ येथून प्रवासाला सुरुवात केली, नंतर चित्रकूटमध्ये श्रीरामाचे दर्शन घेतले, मैहर शक्तिपीठ करून माँ नर्मदेच्या दर्शनासाठी ते जबलपूरला आले आणि नागपूरमार्गे संभाजीनगरला गेले, त्यानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शनि शिंगणापूर, शिर्डी येथे गेले. ते १७०० किमी चालले होते आणि तुम्ही हा स्तंभ वाचत असाल तोपर्यंत ते मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले असतील. येथून २१०० किमीचा प्रवास करून सोमनाथमार्गे ७१ दिवसांत ते तिरुपतीला पोहोचतील. मी विचारले की, एकटे का जात आहात, कोणी सोबतीला का नाही घेतले? तर ते म्हणाले, ‘मी संपूर्ण प्रवासात जय श्रीराम, ओम नमः शिवाय किंवा राधे-राधेचा जप करत आहे. हे संपूर्ण १२० दिवस माझ्या निर्मात्याला समर्पित आहेत, त्यामुळे मी माझे मन विचलित करू इच्छित नाही. कोणाला सोबत घेतले असते तर वाटेत गप्पा मारत गेलो असतो आणि श्रद्धेचे महत्त्व कुठे तरी हरवले असते. मी या क्षणी संन्याशाप्रमाणे आहे. मी आणि माझा विश्वास यात कोणीही नाही. ७२ किलो वजन असलेल्या माजी सैनिकाने प्रवास सुरू केल्यापासून १८ किलो वजन कमी झाले आहे आणि ते दररोज ४०-४५ किमी चालतात. त्यांच्या बॅगेत कपड्यांची एक जोडी आहे, ते रोज रात्री कपडे धुतात. ते दिवसातून एकदाच रोटी, भाजी, वरण खातात. ते दिवसाची सुरुवात सकाळी ७ वाजता प्रार्थनेने करतात आणि नंतर संध्याकाळी ७ किंवा ८ वाजता थांबतात, ते झोपण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी जागा कुठे मिळते यावर अवलंबून असते. लेहमधील पोस्टिंगदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला होता आणि २०१९ मध्ये अहमदनगरमध्ये शेवटच्या पोस्टिंगमध्ये डॉक्टरांना त्यांची समस्या आढळली. म्हणूनच त्यांनी सैन्य सोडून लखनौला आपल्या वृद्ध आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांना १२ आणि ३ वर्षांची दोन मुले आहेत आणि आपल्या पत्नीसह संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते आपल्या दिवंगत वडिलांच्या दोन एकर जमिनीवर शेती करतात. होळीच्या दिवशी सिवनी येथे काही नशेबाजांनी त्यांचे सर्व सामान हिसकावले होते. एका माजी सैनिकाने त्यांना एफआयआर दाखल करण्यासाठी, नवीन सिम आणि फोन घेण्यासाठी मदत केली. {फंडा असा की, तुमचा विश्वास असेल तर तो अमित यांच्यासारखा अतूट असावा. मग ते भगवान शिव असोत, श्रीराम असोत किंवा श्रीकृष्ण असोत, ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात व मनात नेहमीच प्रासंगिक राहतील आणि पिढ्यान््पिढ्या आपल्याला प्रेरणा देत राहतील.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]