आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी दाखल करण्यास नकार दिला तर?:एफआयआर दाखल न केल्यास कोर्टात जावे

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी घटना किंवा गुन्हा घडल्यानंतर पहिल्यांदा त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागते. परंतु पोलिस एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे नेहमीच दिसून येते. वकील मनीष भदौरिया यांनी याबद्दल दिलेली माहिती पाहूया...

कधी व कशा प्रकारे एफआयआर लिहिला जातो? एखादा गुन्हा, घटना, फसवणूक, चोरी, हत्या, मारहाण इत्यादीबाबत पोलिसांत तक्रार दिली जाते. त्यास एफआयआर म्हटले जाते. एफआयआर दाखल करण्यामधील विलंब पुराव्याचे महत्त्व कमी करणारे ठरू शकते. नोंदीसाठी साध्या कागदावर घटनेचा तपशील द्यावा. एफआयआर कोठे व कसा दाखल करावा? गुन्हा घडलेले ठिकाण ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा. त्यात तारीख, वेळ, ठिकाण आणि आरोपीची आेळख अचूक असावी. तपासासाठी पूरक अशा साक्षीदारांची नावेही द्यावीत. पोलिस हेल्पलाइनवरदेखील संपर्क साधता येईल. एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्यास? पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यास पोलिस अधीक्षक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी किंवा ई-मेलने तक्रार द्यावी. याचिकाकर्त्याला न्यायालयातही दाद मागता येते. पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यासाठी आदेश देण्याची विनंती तेथे कोर्टाला केली जावी. कोर्टात जाताना स्वत: पुरावे सादर करावेत.

ऑनलाइन एफआयआर कसा नोंदवावा? विशिष्ट श्रेणीतील गुन्ह्याशी संबंधित ऑनलाइन एफआयआर दाखल करता येऊ शकतो. त्यासाठी शहर किंवा राज्य पोेलिसांच्या पोर्टलवर आपली नोंदणी करावी लागते. उदाहरणार्थ- दिल्ली पोलिसांसाठी delhipolice.nic.in यावर लॉग इन करावे. निर्देशांचे पालन करून तक्रार दाखल करावी.

मग पोलिसांवर कारवाई होते? होय. एफआयआर दाखल न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई होते. १० हजार रुपये दंडही लागू शकतो.

बातम्या आणखी आहेत...