आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:प्रत्येकामध्ये देव दिसू लागला तर भेदभाव नाहीसा होईल

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही भक्त म्हणतात, देव भेदभाव का करतो? देव नेहमी म्हणतो की, मी भावनांचा भुकेला आहे, मी भेदभाव करत नाही. सजीवांच्या भावनांमुळे फरक दिसून येतो. ज्या भावनेने आपण देवाची उपासना करतो, त्याच भावनेने देव आपल्या जीवनात येईल. देव म्हणतो, मला समजून घ्यायचे असेल तर शास्त्र जीवनात आणा. कोणतेही पुस्तक वा धर्मग्रंथ तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही हे खरे आहे, पण ते तुमच्या आत स्वर्ग आणतील, हेही खरे आहे आणि स्वर्ग भेदभाव करत नाही. तिथे देवाचे सान्निध्य आहे. सध्या जीवनात गरीब व श्रीमंत असा भेदभाव पाहत आहोत. त्यानंतर स्त्री-पुरुष भेदभावाचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपल्याला स्वर्गाची गरज आहे, जेणेकरून आपण देवाच्या इतके जवळ जावे की प्रत्येकामध्ये देव पाहू लागलो तर भेदभाव नाहीसा होईल. अन्यथा आज आपल्या देशातील २० कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. ३० कोटींचे उत्पन्न ३७५ रुपयांपेक्षा कमी आहे. महागाईने कपाळावर आठ्या पाडल्या आहेत. फॅशन ही जीवनशैली झाली आहे, पूर्वी ती जीवनशैलीचा एक भाग होती. लोक फॅशनवर इतका खर्च करतात की जगाच्या अर्ध्या लोकसंख्येला पोसता येईल. या भेदांतून जात असाल तर शास्त्रे तुमच्या जीवनात घ्या आणि शास्त्राच्या राजमार्गाने परमात्म्यापर्यंत पोहोचा, मग कदाचित हा भेदभाव तुम्हाला त्रास देणार नाही. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...