आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघडी खिडकी:सकारात्मक असाल तर स्वतःचीच सर्वोत्तम आवृत्ती म्हणवले जाल

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॅनियल एच. पिंक यांनी आतापर्यंत सात पुस्तके लिहिली आहेत आणि माणसांना कोणत्या गोष्टी प्रेरित करतात यावर त्यांची भाषणे व व्याख्याने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सात पुस्तकांपैकी पाच पुस्तकांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीत स्थान मिळवले आहे. त्यांनी नॅशनल जिओग्राफिकसाठी क्राउड कंट्रोल ही टीव्ही मालिकाही होस्ट केली. द पॉवर ऑफ रिग्रेट हे त्यांचे नवीन पुस्तक आहे. इतर लोकप्रिय पुस्तके म्हणजे टू सेल इज ह्युमन, ड्राइव्ह : द सरप्रायजिंग ट्रुथ अबाउट मूव्हिंग अदर्स, अ होल न्यू माइंड, द फ्यूचर ऑफ वर्किंग फॉर युवरसेल्फ इ.

आपल्याकडे या तीन प्रेरणा आहेत का... तीन गोष्टी माणसाला चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात. पहिली स्वायत्तता म्हणजे जीवनाचे सूत्र स्वतःच्या हातात घेण्याची इच्छा, दुसरे म्हणजे प्रभुत्व म्हणजे कौशल्ये सुधारण्याची आणि विकसित करण्याची आवड आणि तिसरा उद्देश म्हणजे जीवनात स्वतःच्या हितापेक्षा मोठे ध्येय असणे. आपल्याकडे अशा प्रेरणा असतील तर त्यांचा उपयोग करून पूर्वीपेक्षा स्वतःत सुधारणा कशी करता येईल, हे आपण स्वतःला विचारले पाहिजे.

स्पेस देणे शिका, स्थिती चांगली होईल... सहसा आपण एखाद्याकडून काम करून घेतो तेव्हा त्याची स्वायत्तता कमी होते आणि त्याला त्याच्या जीवनावर नियंत्रण नसल्यासारखे वाटते. म्हणून आधुनिक दृष्टिकोन म्हणजे एखाद्याला स्वायत्तता देऊन त्याच्याकडून काम करून घेणे, म्हणजे त्यांना वैयक्तिक प्रकल्प देणे किंवा त्यांना एक दिवसाची सुटी देत त्याच्या विकासासाठी प्रवृत्त करणे. एखाद्याला आपण स्पेस देतो तेव्हा त्याची चांगलीच फळे मिळतात, हे नक्की.

उद्दिष्ट एकच, उत्पादकता वाढवणे... रिझल्ट ओन्ली वर्क एन्व्हायर्नमेंट (आरओडब्ल्यूई) हा असाच आणखी एक दृष्टिकोन आहे. तो व्यक्तीची स्वायत्तता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. मूळ कल्पना अशी आहे की, काम नीट केले तर ते कामाच्या वेळेत झाले की नाही हे महत्त्वाचे नाही. कारण स्वायत्ततेमुळे उत्पादकता वाढते.

जग चांगले बनवण्याचे समीकरण... स्वायत्तता, निपुणता आणि हेतू याला आपण जग आणखी चांगले करण्याचे सूत्रही म्हणू शकतो. आपली स्व-प्रतिमा सकारात्मक असेल तर आपण स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करू शकतो.

टेड टॉक : द पझल ऑफ़ मोटिव्हेशन वक्ते : डॅन पिंक, अमेरिकन बेस्टसेलर लेखक आणि प्रेरक वक्ते. सातत्याने प्रेरणादायी लिखाण करतात.

बातम्या आणखी आहेत...