आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस:चाललात तर आयुष्यही चालेल...

टीम मधुरिमा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सं शाेधनानुसार, दिवसातून १० मिनिटे चालण्याने अल्झायमरचा धोका ३२ टक्क्यांनी कमी होतो. ज्या महिला नियमित चालतात, त्यांचे पाय मजबूत होतात आणि गुडघेदुखीचा त्रास होत नाही. रोज काही वेळ व्यायाम केल्यानेे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका ३५ टक्के, गर्भाशयाच्या कॅन्सरचा २३ टक्के, स्तनाच्या कॅन्सरचा १६ टक्के, आतड्यंाचा कॅन्सरचा ५३ टक्के आणि अन्य कॅन्सरचा धोका ५३ टक्क्यांनी कमी होतो. डिप्रेशन किंवा नैराश्य आलेल्या रुग्णांसाठी चालणे हे उत्तम औषध असल्याचे ड्युक विद्यापीठातील संशोधकाचे म्हणणे आहे. रोज व्यायाम करणाऱ्यांचा मधुमेहाचा धोका ४० टक्के कमी होतो.

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी चालणे एक सर्वश्रेष्ठ औषध आहे. जे लोक रोज ३० मिनिटे चालतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती न चालणाऱ्या लोकांपेक्षा ४० टक्के जास्त असते. स्थूलत्वाच्या रुग्णांसाठी चालणे आणि व्यायामापेक्षा चांगले औषध असू शकत नाही. दररोज वेगाने चालणाऱ्या ५५ टक्के निद्रानाशाच्या रुग्णांना लवकर झाेप लागते आणि रात्री अचानक जाग येण्याच्या समस्येमध्ये ३० टक्के घट होते. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक दिवसातून ३० मिनिटे चालतात त्यांचा स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.

वरील संशोधनाच्या निष्कर्षांवरून हे स्पष्ट होते की, चालणे हे आपल्यासाठी सर्वोत्तम औषधांपैकी एक आहे. हे वाचून तुम्हालाही जिम जॉइन करावी, असे वाटत असेल. तुम्हीही रोज धावण्याचा प्लॅन केला असेल.. रोज सकाळी उठल्यावर लांब चालण्यासाठी मार्गाची निवड करत असाल.. पण दुर्दैव असे की, जवळपास ९० टक्के लोक सहा महिन्यांच्या आत वर्कआऊट किंवा व्यायाम करणे सोडून देतात आणि व्यायामाअभावी निष्क्रिय व्हायला लागतात. तुम्ही काय कराल? हा प्लॅन निवडा - चालणे ही तुमची सवय किंवा मजबुरी बनवा. आपली कार किंवा वाहन ऑफिसपासून अर्धा किंवा एक किलोमीटरवर पार्क करा. दूध, भाजीपाला, किराणा सामान घेण्यासाठी स्वतः चालत जा. मॉलमध्ये खरेदीला गेल्यावर लिफ्ट किंवा एलिव्हेटरचा वापर करू नका. जिने वापरा. एक ते दोन किलोमीटर अंतरातील सगळी कामे पायी किंवा सायकलने करा. दररोज चालण्याचे निश्चित ध्येय ठेवा, जसे की दिवसातून दहा हजार पावले. पेडोमीटर खरेदी करा किंवा डाऊनलोड करा. हे आपण किती पावलं चाललो, ते सांगेल. बाहेर जायला वाव नसेल, तर एका ठिकाणी उभे राहून कदमताल करू शकता, स्पॉट जॉगिंग किंवा ड्रिब्लिंग करा. जिममध्ये ट्रेडमिलवर चाला.