आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • If Mantras Are Combined With Breath, Control Of Vices Is Easy | Article By Pt. Vijayshankar Mehata

जीवनमार्ग:मंत्रांना  श्वासाशी जोडल्यास दुर्गुणांवरील नियंत्रण सोपे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीराम आणि रावणामध्ये युद्ध सुरू होते. या युद्धाच्या पाचव्या दिवशी रावण रथावर बसून श्रीरामाशी लढण्यास आला असता श्रीराम पायी असल्याचे बिभीषणाने पाहिले. रामाच्या पायांत पादत्राणेही नव्हती. म्हणून तुम्हीही रथात बसा असा आग्रह विभीषणाने केला. तेव्हा श्रीराम म्हणाले, ‘सुनहु सखा कह कृपानिधाना। जेहिं जय होइ सो स्यंदन आना।।’ मित्रा, ज्यावर चढून विजय प्राप्त होतो तो रथ वेगळाच असतो. त्या रथाचे नाव आहे धर्मरथ. असे युद्ध आपल्या अंत:करणातील सद्गुण व दुर्गुणांमध्ये सातत्याने सुरूच असते. युद्धाचा पाचवा दिवस होता. आपल्या शरीरातही सात चक्रांपैकी पाचव्या चक्रावर ऊर्जा येते तेव्हा आत्मा दिसतो. वास्तव हे आहे की, दुर्गुणांवरील विजय आत्म्यावर टिकूनच प्राप्त करता येतो. शरीर आणि मन यामध्ये सहकार्य करणार नाहीत. कारण ते समर्थ नसतात. दुर्गुण या दोन्हींना लवकर गुंडाळतात. अशा प्रयत्नांमध्ये मंत्र खूप मदत करतात. मंत्रांना श्वासाशी जोडल्यास दुर्गुणांवर नियंत्रण मिळवणे सोपे आहे. हनुमान चालिसा एक मंत्र आहे. संपूर्ण जगात याचा महापाठ होतो. जयपूरमध्ये महापर्व उत्सव समिती विजयादशमीच्या पूर्वसंध्येला याचे आयोजन करते. सुभारती टीव्हीवर हा कार्यक्रम तुम्हीही सायंकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत बघा, ऐका आणि शक्तीचा सदुपयोग करा.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

बातम्या आणखी आहेत...